India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : चौथ्या कसोटीत इंग्लंडनं ओली पोप व ख्रिस वोक्स यांना संघात स्थान दिले. या दोघांनीच टीम इंडियाचे कंबरडे मोडले. ५ बाद ६२ अशा दयनीय अवस्थेत असलेल्या इंग्लंडसाठी पोव व जॉनी बेअरस्टो ही जोडी धावून आली. त्यानंतर पोपनं चतूर खेळ केला. वोक्सनं अखेरच्या विकेटसाठी तुफान फटकेबाजी करताना इंग्लंडला पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडनं पहिल्या डावात २९० धावा केल्या. उमेश यादवनं सर्वाधिक ३, तर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारतानं दुसऱ्या डावात बिनबाद ४३ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा २० व लोकेश राहुल २२ धावांवर खेळत आहेत. या जोडीनं आज १९३६ सालचा विक्रम मोडला.
५ फलंदाज ६२ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडनं चौथ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवलं. ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांच्या ८९ धावांच्या भागीदारीनं इंग्लंडनं आघाडीच्या दिशेनं वाटचाल केली. बेअरस्टो बाद झाला, परंतु पोपला अष्टपैलू मोईन अलीची साथ मिळाली. संघात कमबॅक करणाऱ्या ख्रिस वोक्सनं गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही तुफान फटकेबाजी केली. शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संघासाठी देवासारखा धावला. त्याच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात पोप त्रिफळाचीत झाला. त्यानं १५९ चेंडूंत ८१ धावा काढल्या. india vs england 4th test, india vs england 4th test live
लोकेश व रोहित यांनी यावेळी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये दुसरे स्थान पटकावले. लोकेश व रोहित यांनी या मालिकेत ३६७* धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी भारतीय सलामीवीरांमध्ये सुनील गावस्कर व चेतन चौहान ही जोडी आघाडीवर आहे. त्यांनी १९७९च्या मालिकेत ४५३ धावा जोडल्या होत्या. रोहित व लोकेश यांनी ८५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९३६मध्ये विजय मर्चंट व सय्यद मुश्ताक अली यांनी ३६६ धावा जोडल्या होत्या. ( Rahul & Rohit have gone past an illustrious opening pair, Most runs by an Indian opening pair in a series in ENG) india vs england 4th test live udates, ind vs eng live test match