India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : ५ फलंदाज ६२ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडनं चौथ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवलं. उमेश यादवनं टीम इंडियाला सामन्यावर पकड मिळवून दिली होती, परंतु ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांनी ती पकड सैल केली. या दोघांच्या ८९ धावांच्या भागीदारीनं इंग्लंडनं आघाडीच्या दिशेनं वाटचाल केली. बेअरस्टो बाद झाला, परंतु पोपला अष्टपैलू मोईन अलीची साथ मिळाली. हाच अली बाद झाला होता, परंतु विराट कोहली अँड टीमच्या एका चूकीनं त्याला जीवदान मिळालं. india vs england 4th test, india vs england 4th test live
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात उमेश यादवनं दोन विकेट्स घेतल्या. पहिले त्यानं क्रेग ओव्हर्टनला ( १) बाद केले आणि त्यानंतर डेवीड मलानचा ( ३१) अडथळा दूर केला. ऑली पोप व जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी करताना इंग्लंडला शतकी पल्ला ओलांडून दिला. लंच ब्रेकनंतर मोहम्मद सिराजनं ही डोईजड झालेली जोडी तोडली. पोप व बेअरस्टो यांनी सहाव्या विकेटसाठी १३९ चेंडूंत ८९ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो ३७ धावांवर सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard
बेअरस्टो बाद झाला तेव्हा इंग्लंडचा संघ ४० धावांनी पिछाडीवर होता. पोप व अलीनं त्यानंतर सूत्र हाती घेतली. पोपनं अर्धशतक पूर्ण करताना अलीसोबत अर्धशतकी भागीदारीही केली. या दोघांच्या या भागीदारीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी घेता आली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर अली पायचीत होता, पण टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला त्यासाठी अपील करण्याची गरज भासली नाही. सुरुवातीला चेंडू अलीच्या पायावर आदळण्यापूर्वी बॅटला लागल्याचा अंदाज खेळाडूंना होता, परंतु रिप्लेत चेंडू थेट अलीच्या पायाला लागला अन् तो चेंडू यष्टींवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले.
पहिल्या दिवशी काय घडले...
ओव्हल कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या गोलंदाजांनी गाजवला. विराट कोहली व शार्दूल ठाकूर यांनी अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळून यजमानांनी दिवसअखेर ३ बाद ५३ धावा केल्या होत्या. रोरी बर्न्स ( ५) व हसीब हमीद ( ०) यांना इंग्लंडला चांगली सुरुवात करून देता आली नाही. फॉर्मात असलेल्या जो रूट व डेवीड मलान या जोडीनं इंग्लंडला सावरले. त्यानं मलानसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६९ चेंडूंत ४६ धावा जोडल्या. २५ चेंडूंत २१ धावा करणाऱ्या रूटची एकाग्रता मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या उमेश यादवनं भंग केली. उमेशच्या अप्रतिम इनस्वींग चेंडूनं रूटचा त्रिफळा उडवला.
Web Title: India vs England 4th test Live : Moeen Ali's LBW in Jasprit Bumrah's over was out and no reviews were taken
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.