India vs England 4th test Live : इंग्लंडच्या फलंदाजाकडून खेळपट्टीशी छेडछाड; टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली भडकला, Video 

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : ओव्हल कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या गोलंदाजांनी गाजवला. टीम इंडियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळून यजमानांनी दिवसअखेर ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. उ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 03:19 PM2021-09-03T15:19:56+5:302021-09-03T15:21:23+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th test Live : the moment that Virat Kohli brought Haseeb Hameed's 'footmark stance' to the umpire's notice, Video | India vs England 4th test Live : इंग्लंडच्या फलंदाजाकडून खेळपट्टीशी छेडछाड; टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली भडकला, Video 

India vs England 4th test Live : इंग्लंडच्या फलंदाजाकडून खेळपट्टीशी छेडछाड; टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली भडकला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : ओव्हल कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या गोलंदाजांनी गाजवला. टीम इंडियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळून यजमानांनी दिवसअखेर ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. उमेश यादवनं टीम इंडियाला महत्त्वाची विकेट मिळवून देताना इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला माघारी पाठवले. त्यामुळे आजच्या दिवसातील पहिल्या सत्रात इंग्लंडची कसोटी लागणार आहे, तत्पूर्वी इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीद ( Haseeb Hameed) याचा खेळपट्टी बिघडवण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना मैदानावरील अम्पायरकडे तक्रार केली. ( This was the moment that Kohli brought Hameed's 'footmark stance' to the umpire's notice)

गुडघ्यातून रक्त वाहत असूनही टीम इंडियाला सतावण्यासाठी  'तो' मैदानावर खेळत राहिला!

पहिल्या दिवशी १२७ धावांवर भारताचा अखेरचा फलंदाज रिषभ पंत माघारी परतला अन् इंग्लंडला शेपूटच गुंडाळायचे होते. पण, टीम इंडियाच्या ताफ्यात कमबॅक करणाऱ्या  शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) नं इंग्लंडच्या गोलंदाजांना झुंजवले. १५८च्या स्ट्राईक रेटनं त्यानं चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि ७ बाद १२७ धावांवरून टीम इंडियाची धावसंख्या १९० धावांपर्यंत नेली. शार्दूलनं ३६ चेंडूंत ५७ धावा केल्या. या खेळीत ७ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. पण, तो बाद झाला अन् एक धावेत उर्वरित दोन फलंदाज माघारी परतेल.   india vs england 4th test, india vs england 4th test live

जगात भारी, विराट कोहली!; कॅप्टन कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम!

प्रत्युत्तरात इंग्लंडचे दोन्ही सलामावीर फलकावर ६ धावा असताना जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर माघारी परतले. रोरी बर्न्स ( ५) व हसीब हमीद ( ०) यांना इंग्लंडला चांगली सुरुवात करून देता आली नाही. फॉर्मात असलेल्या जो रूट व डेवीड मलान या जोडीनं इंग्लंडला सावरले. त्यानं मलानसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६९ चेंडूंत ४६ धावा जोडल्या. २५ चेंडूंत २१ धावा करणाऱ्या रूटची एकाग्रता मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या उमेश यादवनं भंग केली. उमेशच्या अप्रतिम इनस्वींग चेंडूनं रूटचा त्रिफळा उडवला. इंग्लंडनं दिवसअखेर ३ बाद ५३ धावा केल्या असून ते अजूनही १३८ धावांनी पिछाडीवर आहेत. india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard

पाहा धक्कादायक व्हिडीओ..  


Web Title: India vs England 4th test Live : the moment that Virat Kohli brought Haseeb Hameed's 'footmark stance' to the umpire's notice, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.