Join us  

India vs England 4th test Live : कपिल देव यांच्यानंतर आता शार्दूल ठाकूरचे नाव गाजले; इंग्लंडच्या गोलंदाजांना त्यानं पाणी पाजले

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : टीम इंडियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 9:35 PM

Open in App
ठळक मुद्देशार्दूल फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाची अवस्था ७ बाद १२७ अशी होती अन् तो बाद झाला तेव्हा टीम इंडियाच्या ८ बाद १९० धावा झाल्या.

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : टीम इंडियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. विराट कोहली ( Virat Kohli) व शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) वगळता भारताचे सर्व फलंदाज ढेपाळले. दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानावर उतरून पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या ख्रिस वोक्सनं ( Chris Woakes) टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले. शार्दूलच्या आक्रमक खेळीनं टीम  इंडियानं कसाबसा दोनशेसमीप पल्ला गाठला. शार्दूलनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं अन् कपिल देव यांच्यानंतर इंग्लंडमधील हे भारतीय फलंदाजाचे दुसरे जलद अर्धशतक आहे. या कसोटीत भारताकडून शार्दूलनं सर्वाधिक धावा केल्या. india vs england 4th test, india vs england 4th test live

Out or Not Out?; अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी, पण तो आऊट होता की नाही? Video 

इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी संयमी सुरुवात केली. पण, रोहित ११ व लोकेश १७ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ११ धावांची भागीदारी जेम्स अँडरसननं तोडली. पुजारा ४ धावांवर माघारी परतला.  पुजारा बाद होताच पाचव्या क्रमांकावर टीम व्यवस्थापनानं रवींद्र जडेजाला पाठवले. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्काच होता. वोक्सनं रूटकरवी रवींद्र जडेजाला ( १०) माघारी पाठवले. india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard, 

विराट कोहली ठरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात विक्रमी फलंदाज, सचिनसह अनेकांना टाकले मागे!

विराट व अजिंक्य दोघंही खेळपट्टीवर चिकटले. वोक्सनं अजिंक्यसाठी पायचीतची अपील केली अन् मैदानावरील पंचांनी त्याला बादही दिले. पण, विराटच्या सांगण्यावरून अजिंक्यनं DRS घेतला आणि त्याला जीवदान मिळाले. विराटनं ( Virat Kohi) मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना टीम इंडियाचा डाव सावरला होता. पण, पुन्हा एकदा त्याची ही गाडी शतकापर्यंत पोहोचू शकली नाही. ऑली रॉबिन्सननं अप्रतिम चेंडू टाकून त्याला बाद केले. विराट ९६ चेंडूंत ८ चौकारांसह ५० धावांवर बाद झाला. विराटपाठोपाठ अजिंक्यही ( १०) माघारी परतला.  india vs england 4th test live udates, 

सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणाऱ्या जेम्स अँडरसनचं 'समर्पण' पाहा; Photo Viral 

या मालिकेतील कामगिरीविराट कोहली - ०, ४२, २०, ७, ५५, ५०चेतेश्वर पुजारा - ४, १२*, ९, ४५, १, ९१, ४अजिंक्य रहाणे - ५, १, ६१, १८, १०, १४  

 मोहम्मद शमीच्या जागी संघात स्थान पटकावलेल्या शार्दूल ठाकूरनं आक्रमक खेळी केली. शार्दूलनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले अन् आजच्या डावातील टीम इंडियाकडून ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. कपिल देव ( ३० चेंडू) यांच्यानंतर कसोटीत भारतीय खेळाडूनं केलेलं हे दुसरं जलद अर्धशतक ठरले. १९८६नंतर ओव्हलवरील ही सर्वात जलद अर्धशतकी खेळी आहे. यापूर्वी बॉथम यांनी ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.  शार्दूल फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाची अवस्था ७ बाद १२७ अशी होती अन् तो बाद झाला तेव्हा टीम इंडियाच्या ८ बाद १९० धावा झाल्या. शार्दूलनं ३६ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा चोपल्या. ( Shardul Thakur is now the highest run scorer of the Indian innings)  भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडला. ख्रिस वोक्सनं चार, तर ऑली रॉबिन्सननं तीन विकेट्स घेतल्या.  ind vs eng live test match, ind vs eng live score, ind vs eng live score

   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशार्दुल ठाकूरविराट कोहली
Open in App