India vs England 4th test Live : शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला तारलं; जसप्रीत बुरमाह, उमेश यादवनं इंग्लंडला हादरवलं

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : १२७ धावांवर भारताचा अखेरचा फलंदाज रिषभ पंत माघारी परतला अन् इंग्लंडला शेपूटच गुंडाळायचे होते. पण शार्दूल ठाकूरनं धु धु धुतले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:08 PM2021-09-02T23:08:55+5:302021-09-02T23:17:15+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th test live : Stumps on Day 1 - England trailing by 138 runs with 7 wickets in hand in the first innings | India vs England 4th test Live : शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला तारलं; जसप्रीत बुरमाह, उमेश यादवनं इंग्लंडला हादरवलं

India vs England 4th test Live : शार्दूल ठाकूरनं टीम इंडियाला तारलं; जसप्रीत बुरमाह, उमेश यादवनं इंग्लंडला हादरवलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे टीम इंडियाच्या ताफ्यात कमबॅक करणाऱ्या शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) नं इंग्लंडच्या गोलंदाजांना झुंजवले. १५८च्या स्ट्राईक रेटनं त्यानं चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि ७ बाद १२७ धावांवरून टीम इंडियाची धावसंख्या १९० धावांपर्यंत नेली.

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : १२७ धावांवर भारताचा अखेरचा फलंदाज रिषभ पंत माघारी परतला अन् इंग्लंडला शेपूटच गुंडाळायचे होते. पण, टीम इंडियाच्या ताफ्यात कमबॅक करणाऱ्या  शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) नं इंग्लंडच्या गोलंदाजांना झुंजवले. १५८च्या स्ट्राईक रेटनं त्यानं चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि ७ बाद १२७ धावांवरून टीम इंडियाची धावसंख्या १९० धावांपर्यंत नेली. शार्दूलनं ३६ चेंडूंत ५७ धावा केल्या अन् १९८६ साली इयान बॉथन यांनी नोंदवलेला विक्रम मोडला. शार्दूलच्या या खेळीत ७ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. पण, तो बाद झाला अन् एक धावेत उर्वरित दोन फलंदाज माघारी परतेल. इंग्लंडचेही तीन फलंदाज माघारी पाठवून टीम इंडियानं सामन्यावर पकड घेतली आहे. india vs england 4th test, india vs england 4th test live

जगात भारी, विराट कोहली!; कॅप्टन कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम!

टीम इंडियाच्या स्टार फलंदाजांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. लोकेश राहुल ( १७) व रोहित शर्मा ( ११) हे झटपट माघारी परतल्यानंतर सर्व भार मधल्या फळीवर आला. पण, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीनं पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनं गुडघ्यातून रक्त येत असूनही केवळ विराट कोहलीला बाद करण्यासाठी गोलंदाजी करत होता. त्याचे हे समर्पण सहकाऱ्यांनी वाया जाऊ दिले नाही. पाचव्या क्रमांकावर बढती मिळालेला रवींद्र जडेजाही अपयशी ठरला. विराट एकटा खिंड लढवत होता. त्यानं ८ चौकारांसह ५० धावा केल्या.  india vs england 4th test live score, india vs england 4th test scorecard

गुडघ्यातून रक्त वाहत असूनही टीम इंडियाला सतावण्यासाठी  'तो' मैदानावर खेळत राहिला!
 

विराट माघारी जाताच. रिषभ पंतही बाद झाला, परंतु त्यानंतर शार्दूलची आतषबाजी पाहायला मिळाली. भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडला. ख्रिस वोक्सनं चार, तर ऑली रॉबिन्सननं तीन विकेट्स घेतल्या.  इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर ८ ते ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५०+ धावा करणारा शार्दूल तिसरा ( अनिल कुंबळे व रविंद्र जडेजा) भारतीय फलंदाज ठरला. india vs england 4th test live udates, ind vs eng live test match

Out or Not Out?; अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी, पण तो आऊट होता की नाही? Video 

प्रत्युत्तरात इंग्लंडचे दोन्ही सलामावीर फलकावर ६ धावा असताना जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर माघारी परतले. रोरी बर्न्स ( ५) व हसीब हमीद ( ०) यांना इंग्लंडला चांगली सुरुवात करून देता आली नाही. फॉर्मात असलेल्या जो रूट व डेवीड मलान या जोडीनं इंग्लंडला सावरले. या मालिकेत ५००+ धावा करणारा रूट पुन्हा एकदा टीम इंडियासमोर अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. त्यानं मलानसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६९ चेंडूंत ४६ धावा जोडल्या. २५ चेंडूंत २१ धावा करणाऱ्या रूटची एकाग्रता मालिकेत पहिलाच सामना खेळणाऱ्या उमेश यादवनं भंग केली. उमेशच्या अप्रतिम इनस्वींग चेंडूनं रूटचा त्रिफळा उडवला. ind vs eng live score, ind vs eng live score
इंग्लंडनं दिवसअखेर ३ बाद ५३ धावा केल्या असून ते अजूनही १३८ धावांनी पिछाडीवर आहेत.

Web Title: India vs England 4th test live : Stumps on Day 1 - England trailing by 138 runs with 7 wickets in hand in the first innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.