Join us  

IND vs ENG 4th Test : कुलदीप यादवचा स्वॅग! यशस्वी जैस्वाल मागे टाकले, टीम इंडियाला सावरले 

कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) फलंदाजीत आपला दम दाखवताना इंग्लंडच्या गोलंदाजांना हैराण केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 10:31 AM

Open in App

India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) फलंदाजीत आपला दम दाखवताना इंग्लंडच्या गोलंदाजांना हैराण केले आहे. युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल याच्यासह कुलदीपने आठव्या विकेटसाठी भारताचा डाव सावरला. या जोडीने  ७६ धावा जोडताना विक्रम नोंदवले आणि इंग्लड व भारताच्या धावांमधील अंतर कमी केले आहे. दरम्यान, भारताच्या या डावात एकाही फलंदाजाला जे जमले नाही, ते कुलदीप यादवने केले आहे. ७३ धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वाल यालाही कुलदीपने या विक्रमात मागे टाकले आहे. 

जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ५ बाद ११२ वरून ३५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतासमोर आव्हान उभे केले. यजमानांच्या फलंदाजांचा फॉर्म पाहता दुसऱ्याच दिवशी ते आघाडी घेतील असे वाटले होते. पण, शोएब बशीर व झॅक क्रॉली यांनी धक्के दिले. यशस्वी जैस्वाल ( ७३) व शुबमन गिल ( ३८) वगळल्यास भारताचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. भारताची अवस्था ७ बाद १७७ धावा अशी झालेली असताना युवा फलंदाज ध्रुव जुरेल व कुलदीप यादव यांनी दिवसअखेपर्यंत खिंड लढवून संघाला २१९ धावांपर्यंत पोहोचवले आहे. या दोघांनी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या तासात चांगली फलंदाजी करताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रांची येथील कसोटीतील ८व्या विकेटसाठी भारताकडून झालेली ही पहिली अर्धशतकी भागीदारी ठरली. यापूर्वी २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आर अश्विन व उमेश यादव यांनी १४ धावा जोडल्या होत्या.  

कुलदीप यादवने आतापर्यंत १२३ चेंडूंचा सामना केला आहे आणि जो भारताच्या या डावातील सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज बनला आहे. यशस्वी जैस्वालनेही ११७ चेंडू खेळले होते.  कुलदीप दुसऱ्यांदा कसोटीत १००+ चेंडू खेळला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये चत्तोग्राम येथे बांगलादेशविरुद्ध त्याने ११४ चेंडू खेळले होते.  कुलदीप १३१ चेंडूंत २८ धावांवर बाद झाला. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडकुलदीप यादव