Join us  

IND vs ENG 4th Test : 'ध्रुव' तारा! माजी सैनिकाच्या लेकानं इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं; भारताला वाचवलं

India vs England 4th Test Live Update Day 3 कुलदीप-ध्रुव जोडीने ७६ धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 11:36 AM

Open in App

India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : रांचीच्या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी, हे भारताच्या आघाडीच्या फळीला कुलदीप यादव व ध्रुव जुरेल यांनी दाखवले. यशस्वी जैस्वालच्या ७३ धावांच्या खेळीनंतरही इंग्लंडने सामन्यावर पकड घेतली होती. शोएब बशीरने डावात ५ विकेट्स घेताना भारताला बॅकफूटवर फेकलेले. पण, कुलदीप-ध्रुव जोडीने ७६ धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.  

अर्धशतक पूर्ण होताच ध्रुव जुरेलचे कडक सॅल्यूट! कारगिल युद्धात लढले होते त्याचे वडील 

जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ५ बाद ११२ वरून ३५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतासमोर आव्हान उभे केले. भारताची अवस्था ७ बाद १७७ धावा अशी झाली होती. शोएब बशीरने दुसऱ्या दिवशी ४ धक्के दिले. पण, ध्रुव जुरेल व कुलदीप यादव यांनी आठव्या विकेटसाठी ७६ धावा जोडल्या. जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर कुलदीप दुर्दैवीरित्या बाद झाला. चेंडू बॅटला लागून यष्टिंवर आदळला. कुलदीप १३१ चेंडूंत २८ धावांवर बाद झाला आणि या डावातील भारताकडून सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारा फलंदाज ठरला.  ध्रुवने ९६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि कडक सॅल्यूट ठोकून भारतीय सैन्याप्रती असलेला आदर व्यक्त केला. त्याचे वडील कारगिल युद्धात लढले होते.

ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर आला असताना दुसऱ्या बाजूने शोएब बशीरने डावातील पाचवी विकेट घेतली आणि आकाश दीपला ( ९) पायचीत करून माघारी पाठवले. याही वेळेस अम्पायर कॉल भारताच्या विरोधात गेला. पण, त्यानंतर ध्रुवने आक्रमक फटकेबाजी सुरू केली, पण शतकाने हुलकावणी दिली. टॉम हार्टलीने त्याचा त्रिफळा उडवला. जुरेल १४९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ९० धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव ३०७ धावांवर गडगडला. इंग्लंडने पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेतली.   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडकुलदीप यादव