ऐ भाई, जादा हीरो नहीं बनने का! रोहित शर्मा ऑन कॅमेरा सर्फराजला झापताना दिसला, Video 

India vs England 4th Test इंग्लंडला पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळवून भारतासमोर ते १९२ धावांचे लक्ष्य ठेवू शकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 04:30 PM2024-02-25T16:30:59+5:302024-02-25T16:31:13+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th Test Live Update Day 3 : Rohit Sharma to Sarfaraz Khan for not wearing helmet: "Aye, hero nai banne ka, Watch Video  | ऐ भाई, जादा हीरो नहीं बनने का! रोहित शर्मा ऑन कॅमेरा सर्फराजला झापताना दिसला, Video 

ऐ भाई, जादा हीरो नहीं बनने का! रोहित शर्मा ऑन कॅमेरा सर्फराजला झापताना दिसला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th Test Live Update Day 3 Marathi News : भारतीय संघाने मालिका विजयाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. इंग्लंडला पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी मिळवून भारतासमोर ते १९२ धावांचे लक्ष्य ठेवू शकले. आर अश्विन ( ५-५१) व कुलदीप यादव ( ४-२२) यांनी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळला. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून देताना तिसऱ्या दिवशअखेर ८ षटकांत ४० धावा फलकावर चढवल्या. रोहितने २४ धावांच्या खेळीसह कसोटीत ४००० धावांचा टप्पा पार केला आणि इंग्लंडविरुद्ध १००० धावा पूर्ण केल्या. यशस्वी जैस्वाल १६ धावांवर खेळतोय. भारताला विजयासाठी १५२ धावा हव्या आहेत. 

इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०७ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल ( ७३) आणि ध्रुव जुरेल ( ९०) यांनी भारताला तीनशेपार नेले. ध्रुव जुरेल व कुलदीप यादव ( २८) यांनी ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. शोएब बशीरने ११९ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या. रांचीच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात चेंडू फार उसळी घेताना दिसला नाही आणि तो खालीच राहत होता. त्यामुळे इंग्लंडचे फलंदाज चाचपडताना दिसले. झॅक क्रॉली ( ६०) व जॉनी बेअरस्टो ( ३०) वगळल्यास इंग्लंडच्या फलंदाजांना पुन्हा अपयश आले. 


मागील सामन्यातील शतकवीर जो रूट ११ धावांवर पायचीत झाला. त्याच्या विकेटवरून इंग्लंडचे चाहते वाद निर्माण करताना दिसत आहेत. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्स व क्रॉलीचा त्रिफळा उडवून भारताला पुनरागमन करून दिले. त्यानंतर आर अश्विनने फासे टाकले आणि त्यात इंग्लंडचे फलंदाज अडकले. अश्विनने १५.५-०-५१-५ अशी स्पेल टाकली. कसोटीत एका डावात ५ विकेट्स घेण्याची ही त्याची ३५वी वेळ आहे आणि त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली. कुलदीपने १५-२-२२-४ अशी स्पेल टाकली. इंग्लंडचा दुसरा डाव ५३.५ षटकांत १४५ धावांवर गडगडला आणि भारताला १९२ धावांचे आव्हान मिळाले.

दरम्यान, सिली पॉईंटला उभं राहताना सर्फराज खान पॅड, हेल्मेट न घालता उभा होता. तेव्हा स्लीपमध्ये उभा असलेला रोहित त्याला म्हणाला,''ऐ भाई जादा हिरो नही बनने का'' त्याने सर्फराजच्या काळजीपोटी हे म्हटलं. 

Web Title: India vs England 4th Test Live Update Day 3 : Rohit Sharma to Sarfaraz Khan for not wearing helmet: "Aye, hero nai banne ka, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.