IND vs ENG 4th Test : भारताच्या विजयानंतर विराट कोहलीनं केलं ट्विट; म्हणाला, आमच्या युवा संघाचा... 

India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : भारतीय संघाने चौथी कसोटी जिंकून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 02:07 PM2024-02-26T14:07:42+5:302024-02-26T14:07:50+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th Test Live Update Day 4 : Phenomenal series win by our young team. Showed grit, determination and resilience, Virat Kohli react on Team india win | IND vs ENG 4th Test : भारताच्या विजयानंतर विराट कोहलीनं केलं ट्विट; म्हणाला, आमच्या युवा संघाचा... 

IND vs ENG 4th Test : भारताच्या विजयानंतर विराट कोहलीनं केलं ट्विट; म्हणाला, आमच्या युवा संघाचा... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th Test Live Update Day 4 Marathi News : भारतीय संघाने चौथी कसोटी जिंकून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. पहिल्या डावातील नायक ध्रुव जुरेल ( Dhruv Jurel ) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून उभा राहिला. त्याला शुबमन गिलने प्रशंसनीय साथ देताना इंग्लंडचा पराभव निश्चित केला. भारताचा हा घरच्या मैदानावरील सलग १७ वा कसोटी मालिका विजय ठरला. यापूर्वी नोव्हेंबर-डिसेंबर २०१२ मध्ये एलिस्ट कुकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने भारताला शेवटचे पराभूत केले होते.

 
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तारात भारताने ३०७ धावा केल्या. अश्विन ( ५-५१) व कुलदीप ( ४-२२) यांनी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळला. १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ५५)  व यशस्वी जैस्वाल ( ३७) यांनी ८४ धावांची भागीदारी केली. पण, त्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. बिनबाद ८४ वरून भारताची अवस्था ५ बाद १२० धावा अशी दयनीय केली. शुबमन गिल व ध्रुव जुरेल मैदानावर उभे राहिले.  शुबमनग १२४ चेंडूंत ५२ धावांवर नाबाद राहिला आणि जुरेलने नाबाद ३९ धावा केल्या. भारताने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला.  

Image
भारताच्या या विजयावर विराट कोहलीने ट्विट करून कौतुक केले. विराटने दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी या मालिकेतून माघार घेतली होती. 
 

Web Title: India vs England 4th Test Live Update Day 4 : Phenomenal series win by our young team. Showed grit, determination and resilience, Virat Kohli react on Team india win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.