India vs England 4th Test Live Update Marathi News : पदार्पणवीर आकाश दीपने ( Akash Deep) चौथ्या कसोटीत टीम इंडियाला जसप्रीत बुमराहची उणीव अजिबात भासू दिली नाही. पहिल्या षटकापासून त्याने टिच्चून मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवले होते. बिहारच्या दुर्गापूरमधून आलेला टेनिस बॉल क्रिकेटमधील स्टार आकाश आज भारतीय संघात गाजला. त्याने टाकलेल्या चेंडूने झॅक क्रॉलीच्या यष्टिंचा वेध घेतला आणि स्टम्प्स दोन-तीन टप्पे खात राहिला. दुर्दैवाने तो नो बॉल ठरला. पण, आकाशने त्याचा मारा कायम राखताना इंग्लंडला ३ धक्के दिले. त्याने पहिल्या स्पेलमध्ये ७ षटकं फेकून २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
भारत-इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना रांची येथे खेळवला जात आहे. इंग्लंडने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, २७ वर्षीय गोलंदाज आकाश दीप ( Akash Deep) याने पदार्पण गाजवले. त्याने भन्नाट गोलंदाजीने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली याचा त्रिफळा उडवला होता, परंतु नो बॉलमुळे तो वाचला. कसोटीची पहिलीच विकेट नो बॉलमुळे नाकारली जाणारा हा पहिला गोलंदाज नाही. यापूर्वी लसिथ मलिंगा, मिचेल बीअर, बेन स्टोक्स, मार्क वूड, स्टुअर्ट बिन्नी, टॉम कुरन यांच्यासोबतची असे घडले होते.
पण, याची त्याने सव्याज भरपाई केली. आकाशने त्यानंतर एकाच षटकात बेन डकेट ( ११) व ऑली पोप ( ०) यांना माघारी पाठवून इंग्लंडला ४७ धावांवर दोन धक्के दिले. क्रॉली ४२ चेंडूंत ४२ धावा करून खेळपट्टीवर उभा राहिला होता, परंतु आकाशने त्यालाही गुडघे टेकण्यास भाग पाडले.
Web Title: India vs England 4th Test Live Update : Dream debut, Akash Deep ( 7-0-24-3) picks three wickets to dent England in Ranchi, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.