India vs England 4th Test Live Update Marathi News : भारताचे युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल व शुबमन गिल पुन्हा एकदा इंग्लंडच्या माऱ्यासमोर उभे राहिले आहेत. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा कर्णधार रोहित शर्मा २ धावा करून माघारी परतला. पण, त्यानंतर यशस्वी-शुबमन जोडी जमली आणि त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम गाळण्यास भाग पाडले. ही मालिका खऱ्या अर्थाना गाजवणाऱ्या यशस्वीने आजही मोठा पराक्रम नावावर केला. त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा १७ वर्षे जुना विक्रम मोडला.
IND vs ENG : "मुझे भी डर लगता है", यशस्वी जैस्वालचा 'फॅन गर्ल' सोबत मजेशीर संवाद Viral
इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगले पुनरागमन केले. भारताचा पदार्पणवीर आकाश दीपने धक्के दिले, परंतु अनुभवी फलंदाज जो रूट ( Joe Root ) मैदानावर उभा राहिला आणि त्याने ५ बाद ११२ धावांवरून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. जॉनी बेअरस्टो ( ३८) , बेन फोक्स ( ४७) व ऑली रॉबिन्सन ( ५८) यांना सोबत घेऊन रूटने भारताला टक्कर दिली. जो रूटने सहाव्या विकेटसाठी फोक्ससह ११३ धावा जोडल्या आणि रॉबिन्सनसह आठव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रवींद्र जडेजाने इंग्लंडचे शेवटचे तीन फलंदाज माघारी पाठवले. इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर गुंडाळला. जो रूट २७४ चेंडूत १० चौकारांसह १२२ धावांवर नाबाद राहिला. जडेजाने ३, आकाश दीपने ३ आणि मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या.