५ बाद ११२ वरून इंग्लंडने धावांचा डोंगर उभा केला; Joe Root टीम इंडियाला भिडला 

India vs England 4th Test Live Update Marathi News : इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगले पुनरागमन केलेले पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 10:38 AM2024-02-24T10:38:32+5:302024-02-24T10:38:48+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th Test Live Update Marathi News : Ravindra Jadeja strikes, England all out on 353 runs in first innings, Joe Root played a sensational innings, he scored 122* runs. | ५ बाद ११२ वरून इंग्लंडने धावांचा डोंगर उभा केला; Joe Root टीम इंडियाला भिडला 

५ बाद ११२ वरून इंग्लंडने धावांचा डोंगर उभा केला; Joe Root टीम इंडियाला भिडला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 4th Test Live Update Marathi News : इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगले पुनरागमन केलेले पाहायला मिळाला. पदार्पणवीर आकाश दीपने धक्के दिल्याने भारताने दमदार सुरुवात केली. पण, अनुभवी फलंदाज जो रूट ( Joe Root ) मैदानावर उभा राहिला आणि त्याने ५ बाद ११२ धावांवरून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स व ऑली रॉबिन्सन यांना सोबत घेऊन रूटने भारताला टक्कर दिली. दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने एकाच षटकात दोन विकेट घेऊन भारताला पुनरागमन करून दिले. 


आकाश दीपने ( Akash Deep) पदार्पणातच पहिल्या स्पेलमध्ये ३ धक्के देताना इंग्लंडला बॅकफूटवर फेकले होते. ११२ धावांवर निम्मा संघ माघारी परतल्यानंतर भारत लवकर डाव गुंळालेल असे वाटले होते. पण, जो रूटने ( Joe Root ) पारंपरिक खेळ करताना इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले. रुटने फोक्ससह ( ४६) सहाव्या विकेटसाठी ११३ धावांची विक्रमी भागीदारी केली. रुटने त्यानंतर ऑली रॉबिन्सनसोबत शतकी भागीदारी केली. रॉबिन्सनने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात आक्रमक फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले आणि रूटसह शतकी भागीदारीचा टप्पाही ओलांडला. 


रॉबिन्सनचा आक्रमक पवित्रा पाहून मोहम्मद सिराजची चिडचिड होताना दिसली आणि त्याने इंग्लंडच्या खेळाडूसोबत शाब्दिक बाचाबाची केली. रवींद्र जडेजाने ही जोडी अखेर तोडली... रॉबिन्सन ९६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ५८ धावा केल्या आणि रुटसह १०२ ( १६३) धावांची भागीदारी तुटली. त्याच षटकात जडेजाने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना शोएब बशीरला ( ०) माघारी पाठवले. जडेजाने शेवटची विकेट घेऊन इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर गुंडाळला. जो रूट २७४ चेंडूत १० चौकारांसह १२२ धावांवर नाबाद राहिला. जडेजाने ३, आकाश दीपने ३ विकेट्स घेतल्या. 
 

Web Title: India vs England 4th Test Live Update Marathi News : Ravindra Jadeja strikes, England all out on 353 runs in first innings, Joe Root played a sensational innings, he scored 122* runs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.