Join us  

IND vs ENG 4th Test : इंग्लंडच्या फिरकीला 'Umpire Calls' ची मदत; यशस्वी जैस्वालच्या खेळीनंतरही भारत अडचणीत

India vs England 4th Test Live Update इंग्लंडच्या फिरकीपटूंनी बाजी पटलवली. शोएब बशीरने ४ धक्के दिले आणि टॉम हार्टलीने २ विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 4:29 PM

Open in App

India vs England 4th Test Live Update  Marathi News : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) पुन्हा उल्लेखनीय खेळी करताना भारताच्या डावाला आकार दिला होता. पण, इंग्लंडच्या फिरकीपटूंनी बाजी पटलवली. शोएब बशीरने ४ धक्के दिले आणि टॉम हार्टलीने २ विकेट्स घेतल्या. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय सघ बॅकफूटवर गेलेला पाहायला मिळतोय. भारताच्या तीन विकेट्स या अम्पायर कॉलमुळे इंग्लंडला मिळाल्या.

यशस्वी जैस्वालचा भीमपराक्रम! १९७८नंतर असा विक्रम प्रथमच झाला, ब्रॅडमन यांच्या पंक्तित स्थान

आकाश दीपने ३ धक्के दिल्यानंतरही इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगले पुनरागमन केले.  अनुभवी फलंदाज जो रूट ( Joe Root ) मैदानावर उभा राहिला आणि त्याने ५ बाद ११२ धावांवरून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. जॉनी बेअरस्टो ( ३८) , बेन फोक्स ( ४७) व ऑली रॉबिन्सन ( ५८) यांना सोबत घेऊन रूटने भारताला टक्कर दिली. इंग्लंडचा पहिला डाव ३५३ धावांवर आटोपला. जो रूट २७४ चेंडूत १० चौकारांसह १२२ धावांवर नाबाद राहिला. जडेजाने ३, आकाश दीपने ३ आणि मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या. 

रोहित शर्मा ( २) तिसऱ्या षटकात माघारी परतला. यशस्वी जैस्वाल व शुबमन गिल यांनी १३१ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी केली. शोएब बशीरने ही जोडी तोडताना गिलला ( ३८) पायचीत केले. रजत पाटीदार आज सावध खेळताना दिसला, परंतु बशीरने त्यालाही ( १७) पायचीत केले. रवींद्र जडेजा ( १२) आणि यशस्वीलाही बशीरने माघारी पाठवले. यशस्वी ७३ धावांवर ( ११७ चेंडू, ८ चौकार व १ षटकार) त्रिफळाचीत झाला.  त्यानंतर टॉम हार्टलीने दोन धक्के देताना सर्फराज खान ( १४) व आऱ अश्विन ( १) यांना बाद केले. कुलदीप यादव  ( १७) व ध्रुव जुरेल ( ३०) यांनी दिवसअखेर संघर्ष करून संघाला ७ बाद २१९ धावांपर्यंत पोहोचवले. भारत अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडयशस्वी जैस्वाल