India vs England 4th Test Live Update Marathi News : भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवताना इंग्लंडचा निम्मा संघ ११२ धावांवर तंबूत पाठवला. पदार्पणवीर आकाश दीपने ( Akash Deep) ३ विकेट्स घेताना इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. त्यात रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी दोन धक्के देताना भारताला सामन्यात पकड मिळवून दिली. आर अश्विनने इंग्लंडचा सेट फलंदाज जॉनी बेअरस्टोला बाद करून ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला माघारी पाठवले.
W,W,W! पदार्पणवीर आकाश दीपने इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले; ३ धक्के दिले, Video
पदार्पणवीर आकाश दीपने ( Akash Deep) चौथ्या कसोटीत टीम इंडियाला जसप्रीत बुमराहची उणीव अजिबात भासू दिली नाही. पहिल्या षटकापासून त्याने टिच्चून मारा करताना इंग्लंडच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवले होते. २७ वर्षीय गोलंदाज आकाशने पहिल्या स्पेलमध्ये ७ षटकं फेकून २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्याने काच षटकात बेन डकेट ( ११) व ऑली पोप ( ०) यांना माघारी पाठवले, नंतर ४२ धावा करणाऱ्या क्रॉलीला त्रिफळा उडवला. क्रॉलीचा त्याने सुरुवातीच्या षटकातच त्रिफळा उडवला होता, परंतु नो बॉलमुळे त्याला जीवदान मिळाले होते.
एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध कसोटीत १०००+ धावा व १००+ विकेट्स गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) वि. इंग्लंडमाँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया) वि. इंग्लंडविलफ्रेड ऱ्होड्स ( इंग्लंड) वि. ऑस्ट्रेलियाइयान बॉथम ( इंग्लंड) वि. ऑस्ट्रेलियाजॉर्ज गिफन ( ऑस्ट्रेलिया ) वि. इंग्लंडस्टुअर्ट ब्रॉड ( इंग्लंड ) वि. ऑस्ट्रेलियाआर अश्विन ( भारत) वि. इंग्लंड