India vs England 4th test Live : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा निम्मा संघ १०५ धावांत माघारी, Video

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : विराट कोहलीनं ( Virat Kohi) मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना टीम इंडियाचा डाव सावरला. त्याचा शतकाचा दुष्काळ काही संपता संपेना...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:05 PM2021-09-02T20:05:43+5:302021-09-02T20:06:08+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 4th test live : Virat Kohli has been dismissed by Ollie Robinson, Watch team India five wickets Video | India vs England 4th test Live : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा निम्मा संघ १०५ धावांत माघारी, Video

India vs England 4th test Live : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतरही टीम इंडियाचा निम्मा संघ १०५ धावांत माघारी, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

india vs england 4th test 2021 cricket match live scorecard updates : विराट कोहलीनं ( Virat Kohi) मालिकेतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना टीम इंडियाचा डाव सावरला. पण, पुन्हा एकदा त्याची ही गाडी शतकापर्यंत पोहोचू शकली नाही. ऑली रॉबिन्सननं अप्रतिम चेंडू टाकून त्याला बाद केले. विराट ९६ चेंडूंत ८ चौकारांसह ५० धावांवर बाद झाल्यानं टीम इंडियाची अवस्था ५ बाद १०५ अशी दयनीय झाली आहे. 


इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी संयमी सुरुवात केली.  पण, रोहित ११ व लोकेश १७ धावांवर बाद झाला. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ११ धावांची भागीदारी जेम्स अँडरसननं तोडली. पुजारा ४ धावांवर माघारी परतला.  

पुजारा बाद होताच पाचव्या क्रमांकावर टीम व्यवस्थापनानं रवींद्र जडेजाला पाठवले. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्काच होता.  वोक्सनं रुटकरवी रवींद्र जडेजाला ( १०) माघारी पाठवले. विराट व अजिंक्य दोघंही खेळपट्टीवर चिकटले. वोक्सनं अजिंक्यसाठी पायचीतची अपील केली अन् मैदानावरील पंचांनी त्याला बादही दिले. पण, विराटच्या सांगण्यावरून अजिंक्यनं DRS घेतला आणि त्याला जीवदान मिळाले. विराटनं ८५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मालिकेतील त्याचे हे दुसरे व इंग्लंडविरुद्धची सातवी ५०+ धावांची खेळी ठरली. विराटनं यासह महेंद्रसिंग धोनीचा ( ६) विक्र मोडला.(Most 50+ scores by Indian captain in Tests in England)   
पाहा विकेट्स...






 

Web Title: India vs England 4th test live : Virat Kohli has been dismissed by Ollie Robinson, Watch team India five wickets Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.