लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर बरेच विक्रम आहेत. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात एका गोष्टी मागे टाकले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये चौथा कसोटी सामना साऊथम्पटन येथे सुरु आहे. या सामन्यात कोहलीने 21व्या षटकात चौकार लगावला आणि कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा पल्ला गाठला.
कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा 119 डावांमध्ये पूर्ण केला. पण सचिनला कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करण्यासाठी 120 डाव लागले होते. त्यामुळे फक्त एका डावाने कोहली सचिनपेक्षा सरस ठरला आहे.
भारताकडून सर्वात जलद सहा हजार धावा करण्याचा विक्रम माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. गावस्कर यांनी 117 डावांमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या. पण सर डॉन ब्रॅडमन यांनी फक्त 68 डावांमध्ये सहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या.