India vs England 4th Test : भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. टीम इंडियाचा पहिला डाव ७८ धावांवर गुंडाळून इंग्लंडनं विजयाचा पाया रचला होता अन् त्यानंतर गोलंदाजांनी कमाल केली. पहिला डाव असा गडगडल्यानंतर टीम इंडियावर दडपण निर्माण झाले होते, हे कर्णधार विराट कोहलीनं लिड्स कसोटीनंतर मान्य केले. त्याच दडपणात विराटकडून एक चूक होणार होती, परंतु उप कर्णधार अजिंक्य रहाणेनं ती होण्यापासून वाचवले. त्याचा फायदा उचलण्यात विराटला अपयश आलं.
बेन स्टोक्सची उणीव भरून काढणारा अष्टपैलू इंग्लंडच्या ताफ्यात; टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार
इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३५४ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( ५९) व चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाच्या चाहत्यांना आशेचा किरण दाखवला. रोहित दुर्दैवीरित्या बाद झाला. पण, पुजारा व कर्णधार विराट कोहली या जोडीनं तिसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत खिंड लवढून दिलासादायक कामगिरी केली. चौथ्या दिवशी नव्या चेंडूने इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. पुजाराला एकही धावेची भर न घातला ९१ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर विराटही ५५ धावांवर बाद झाला अन् २ बाद २१५ धावांवरून टीम इंडियाची घसरगुंडी सुरू झाली. भारताचे ८ फलंदाज ६३ धावांवर माघारी परतले. इंग्लंडनं एक डाव ७६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.
IPL 2021 जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विराट कोहलीला बसला धक्का, अष्टपैलू खेळाडूची माघार!
नेमकं काय घडलं होतं?
विराट कोहलीला मैदानावरील पंचांनी बाद दिले होते. विराटलाही बॅटीला एज लागल्याचे वाटले अन् तो पॅव्हेलियनच्या दिशेनं निघाला होता. मात्र. अजिंक्य रहाणेनं त्याला DRS घ्यायला लावला. विराटनं ते ऐकलं अन् बॅट व चेंडू यांचा संपर्कच झाला नसल्याचे दिसले आणि पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. ( Virat Kohli was walking after umpire's decision, but Ajinkya Rahane asked him to wait and said to go for the review.)
Web Title: India vs England 4th Test : Virat Kohli was walking after umpire's decision, but Ajinkya Rahane asked him to wait and said to go for the review
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.