ओव्हल, भारत वि. इंग्लंडः इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकने कारकिर्दीच्या अखेरच्या कसोटी सामन्यात खणखणीत शतक झळकावले. त्याच्या 147 आणि कर्णधार जो रूटच्या 125 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाचव्या कसोटीत इंग्लंडसमोर 464 धावांचे उभे केले. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था 3 बाद 58 धावा अशी झाली आहे. चौथ्या दिवसाच्या उल्लेखनीय खेळींतर कुक पत्रकार परिषदेत गेला त्यावेळी त्याला कूssssल गिफ्ट मिळाले.
(सुरूवात अन् शेवटही शतकानं)
xपत्रकार परिषदेत कुक म्हणाला,'' मागील चार दिवस ही माझ्यासाठी अविश्वसनीय ठरले आहेत. चौथ्या दिवसाच्या अखेरच्या काही षटकांत बार्मी आर्मी चाहत्यांकडून माझ्यासाठी विशेष गाणं गायले जात आहे. तो खूप भावनिक क्षण होता.'' कुकचे बोलणे संपल्यानंतर इंग्लंडमधील पत्रकारांनी त्याला आगळंवेगळ गिफ्ट दिले. कसोटी कारकिर्दीत 33 शकते झळकावणाऱ्या कुकला त्यांनी 33 बिअर भेट म्हणून दिल्या. पाहा हा व्हिडिओ...
(India vs England 5th Test: ॲलिस्टर कूकने तेंडुलकर व द्रविड या दिग्गजांशी केली बरोबरी)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय विचारपूर्वक घेतला असल्याचे स्पष्ट करताना कुकने तो मागे घेणार नसल्याचे सांगितले. निवृत्तीनंतरचा संपूर्णवेळ कुटुंबीयांना देणार असल्याचे तो म्हणाला.
Web Title: India vs England 5th Test: 33 centuries, 33 beers, Alastair Cook gets a special farewell gift
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.