ओव्हल, भारत वि. इंग्लंड : इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकने कारकिर्दीतील अखेरच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. त्याच्या १४७ धावा आणि कर्णधार जो रूटच्या १२५ धावांच्या जोरावर इंग्लंडने भारतीय संघासमोर ४६३ धावांचा डोंगर उभा केला. जस्प्रीत बुमराने बाद केल्यानंतर कुकने क्रिकेट चाहत्यांचा भावनिक निरोप स्वीकारला.
(आजी-माजी कर्णधारांचे शतक; भारताला ४६४ धावांचे आव्हान)कुकने कारकिर्दीतील अखेरच्या कसोटीत १४७ धावांची खेळी साकारून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली. त्याने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकले. सर्वाधिक धावा करणारा डावखुऱ्या फलंदाजाचा विक्रमही कुकच्या नावे नोंदवला गेला आहे. तसेच भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.भारताविरुद्ध कुकचे हे सातवे कसोटी शतक ठरले. या कामगिरीसह कुकने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या एका वेगळ्या विक्रमाशी बरोबरी केली. भारत आणि इंग्लंड या उभय देशांत कसोटी मालिकेत तेंडुलकर आणि द्रविड यांच्या नावावर प्रत्येकी ७ शतके होती. कुकने पाचव्या कसोटीत शतक झळकावून तेंडुलकर व द्रविड यांच्या या शतकांशी बरोबरी केली.
(India vs England 5th Test: 'द वॉल' अबाधित; विराट कोहलीला विक्रम मोडण्यात अपयश)
गावस्कर यांचा विक्रम मोडण्यात अपयशीसलामीवीर म्हणून सर्वाधिक 33 शतकं भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर आहेत. या विक्रमापासून कुक दोन शकतं मागे राहिला.