Join us  

India vs England 5th Test: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला दंड 

India vs England 5th Test: इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच फीमधील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याचे आदेश दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 2:31 PM

Open in App

ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटीः इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच फीमधील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्याचे आदेश दिले आहे. भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत त्याने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि त्यासाठी त्याला दंड सुनावण्यात आला. अँडरसन कलम 2.1.5 च्या अंतर्गत दोषी आढळला. त्याने पंचांच्या निर्णयावर तीव्र शब्दात नाराजी प्रकट केली होती.

सप्टेंबर 2016 नंतर अँडरसनकडून प्रथमनच आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. 29 व्या षटकात अँडरसनने पंच कुमार धर्मसेना यांच्या निर्णयावर नाराजी प्रकट केली होती. अँडरसनच्या गोलंदाजीवर विराट कोहली पायचीत असल्याची अपील इंग्लंडच्या खेळाडूंनी केली. परंतु धर्मसेनाने ती नाकारली आणि अँडरसनने त्यांच्याबरोबर उर्मट भाषेत वाद घातला.   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेटजेम्स अँडरसन