India vs England 5th Test: इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी जोडल्या 134 धावा

India vs England 5th Test: इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. 7 बाद 198 धावसंख्येवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात करणाऱ्या इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 06:50 PM2018-09-08T18:50:17+5:302018-09-08T18:50:33+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 5th Test: England's tail enders added 134 runs for the second day | India vs England 5th Test: इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी जोडल्या 134 धावा

India vs England 5th Test: इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी जोडल्या 134 धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ओव्हल, भारत वि. इंग्लंड कसोटीः इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. 7 बाद 198 धावसंख्येवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात करणाऱ्या इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 332 धावांचा डोंगर उभारत भारताचा कर्णधार विराट कोहलीची चिंती वाढवली. 



पहिल्या दिवशी 1 बाद 133 अशा मजबूत स्थितीवरून इंग्लंडचा डाव 7 बाद 198 असा गडगडला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे तीन फलंदाज झटपट बाद करून सामन्यावर पकड घेण्याच्या भारतीय संघाच्या मनसुब्यांना जोस बटरल व स्टुअर्ट ब्रॉड या जोडीने सुरूंग लावला. तत्पूर्वी आदिल रशीदने आठव्या विकेटसाठी बटलरसह 33 धावा जोडून दिवसाची दमदार सुरुवात करून दिली. 

धावफलकावर 214 धावा असताना जस्प्रीत बुमराने रशीदला पायचीत केले आणि ही जोडी फोडली. मात्र, बर्थडे बॉय बटलरने संयमी खेळी करताना ब्रॉडसह इंग्लंडला मोठ्या धावसंख्येकडे कूच करून दिली. बटलरने कसोटीतील 10वे अर्धशतक झळकावताना ब्रॉडसह नवव्या विकेटसाठी 98 धावा जोडल्या. ब्रॉड बाद झाल्यानंतर बटलरने फटकेबाजी करताना इंग्लंडच्या धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु जडेजाने त्याला बाद केले. 



 

Web Title: India vs England 5th Test: England's tail enders added 134 runs for the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.