India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : तीन दिवसांपूर्वी धरमशालाच्या याच मैदानावर पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात जलदगती गोलंदाजांनी ३० विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या भारत-इंग्लंड पाचव्या कसोटीत वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसेल असे वाटले होते. पण, प्रत्यक्षात घडले भरतेच. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गडगडला आणि या सर्व विकेट्स भारताच्या फिरकीपटूंनी घेतल्या. १ बाद १०० अशा मजबूत स्थितीत असलेल्या इंग्लंडचे ९ फलंदाज ११८ धावांची भर घालू शकले. यापैकी ७ विकेट्स या ४३ धावांवर पडल्या. कुलदीप यादवने कसोटी पाच ( ५-७२) विकेट्स घेताना कसोटी कारकीर्दित ५० बळींचा टप्पा ओलांडला.
सर्वात कमी चेंडूत कसोटीत ५० विकेट्स घेणारा तो भारतीय फिरकीपटू ठरला. १०० वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ११.४-१-५१-४ अशी स्पेल टाकली. रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्यामागोमाग जॉनी बेअरस्टो ( २९), बेन डकेट ( २७), जो रूट ( २६) व बेन फोक्स ( २४) यांनी चांगला खेळ केला. इंग्लंडचा डाव गुंडाळल्यानंतर पाच विकेट्स घेणाऱ्या कुलदीपसाठी भारतीय खेळाडूंनी टाळ्या वाजवल्या. कुलदीपने यावेळी पॅव्हेलियनच्या दिशेने टीमला लिड करण्याचा मान अश्विनला देऊ केला. पण, अश्विनने अगदी नम्रपणे हा मान नाकारला आणि म्हणाला हा मान तुझा आहे....
१००व्या कसोटीत एका डावात ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. अनिल कुबंळेने २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध असा पराक्रम केला होता. धरमशाला कसोटीत डावात ५ विकेट्स घेणारा कुलदीप हा पहिला भारतीय व जगातील दुसरा ( ५-९२ नॅथन लायन वि. भारत, २०१७) गोलंदाज ठरला आहे.
Web Title: India vs England 5th Test Live update Day 1 : MOMENT OF THE DAY, Kuldeep Yadav gave Ravi Ashwin the ball as he's playing his 100th Test, but Ashwin denied and gave it back to Kuldeep and let him lead the team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.