India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत १ बाद २६४ धावा करून ४६ धावांची आघाडी घेतली आहे. रोहित व शुबमन यांनी पाठोपाठ शतक झळकावून विक्रम नावावर केले.
कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आणि इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळला. कुलदीप यादवने पाच ( ५-७२) विकेट्स घेतल्या. आर अश्विन ( ४-५१) व रवींद्र जडेजाने ( १ विकेट) चांगला मारा केला. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी १०४ धावांची भागीदारी करून संघाचा पाया मजबूत केला. यशस्वी ५७ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी दमदार फटकेबाजी केली. या दोघांनी शतक झळकावताना भारताला मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल करून दिली. रोहितने १५४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारासह शतक झळकावले. रोहितपाठोपाठ शुबमननेही १३७ चेंडूंत शतक पूर्ण केले.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील रोहितचे हे नववे, तर एकूण १२ वे शतक ठरले. शुबमन यानेही कसोटीतील चौथे शतक झळकावले. सलामीवीर म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकावणाऱ्या सलामीवीरामध्ये रोहितने ( ४३) तिसरे स्थान पटकावले आहे. डेव्हिड वॉर्नर ( ४९) व सचिन तेंडुलकर ( ४५) हे या विक्रमात आघाडीवर आहे, तर रोहितने ख्रिस गेल ( ४२) व सनथ जयसूर्या ( ४१) यांना मागे टाकले. वयाची ३० ओलांडल्यानंतर रोहितने ३५ आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली आहेत आणि त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे रोहितचे ४८वे शतक ठरले आणि त्याने राहुल द्रविडशी बरोबरी केली.
कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक शतकं४१ - विराट कोहली ( २१३ सामने ) १६ - सौरव गांगुली ( १९५ सामने) १३ - मोहम्मद अझरुद्दीन ( २२१ सामने ) १३ - सचिन तेंडुलकर ( ९८ सामने ) ११ - सुनील गावस्कर ( ८४ सामने) ११ - रोहित शर्मा ( ११५ सामने ) ११ - महेंद्रसिंग धोनी ( ३३२ सामने )