Join us  

रोहित शर्मा अन् शुबमन गिल यांचे पाठोपाठ शतक, दोघांच्या सेंच्युरीने भारताकडे मजबूत आघाडी

भारतीय संघाने पाचव्या कसोटीवरील पकड मजबूत केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 11:18 AM

Open in App

India vs England 5th Test Live update (  Marathi News  ) : भारतीय संघाने पाचव्या कसोटीवरील पकड मजबूत केली आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) शतक झळकावताना इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर फेकले आहे. यशस्वी जैस्वालनंतर त्याने शुबमन गिलसह शतकी भागीदारी केली आणि भारताला आघाडी मिळवून दिली. रोहितने १५४ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारासह शतक झळकावले. रोहितपाठोपाठ शुबमननेही १३७ चेंडूंत शतक पूर्ण केले. 

कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवले आणि इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळला. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्यामागोमाग जॉनी बेअरस्टो ( २९), बेन डकेट ( २७), जो रूट ( २६) व बेन फोक्स ( २४) यांनी चांगला खेळ केला.  कुलदीप यादवने कसोटी पाच ( ५-७२) विकेट्स घेतल्या. १०० वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विन ( ४-५१) व रवींद्र जडेजाने ( १ विकेट) चांगला मारा केला. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत भारतीय संघाने मजबूत पकड घेतली आहे. इंग्लंडचा डाव २१८ धावांवर गुंडाळल्यानंतर यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी १०४ धावांची भागीदारी केली. 

यशस्वी ५७ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी दमदार फटकेबाजी केली. गिलने ६४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. गिलने या मालिकेत ४०० हून अधिक धावा पूर्ण केल्या. कसोटी मालिकेत भारताच्या दोन खेळाडूंनी ४०० हून अधिक धावा करण्याची ही या शतकातील चौथी वेळ आहे. यापूर्वी राहुल द्रविड-वीरेंद्र सेहवाग ( वि. श्रीलंका, २००९), मुरली विजय-चेतेश्वर पुजारा ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१३) आणि पुजारा-विराट कोहली ( वि. इंग्लंड, २०१६) यांनी असा पराक्रम केला आहे.  गिल व रोहित यांनी आक्रमक फटकेबाजी करताना शतकी भागीदारी पूर्ण केली आणि भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माशुभमन गिल