India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : शंभरावी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ( R ASHWIN ) ऐतिहासिक कामगिरी केली. पहिल्या डावात ४ विकेट्स घेणाऱ्या भारतीय फिरकीपटूने दुसऱ्या डावात ५ बळी टिपले. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने ३६ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि अनिल कुंबळेचा ( ३५) विक्रम मोडला. याशिवाय त्याने मोठा पराक्रम केला, जो महान फिरकीपटू शेन वॉर्न व मुथय्या मुरलीधरन यांनाही नाही करता आला.
कसोटीच्या १४७ वर्षांत प्रथमच असं घडलं, भारत-इंग्लंड यांनी मिळून विक्रमी शतक ठोकलं
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. कर्णधार रोहित शर्मा पाठीत उसण भरल्याने मैदानावर आला नाही. जसप्रीत बुमराह नेतृत्व करताना दिसला. आर अश्विनने त्याच्या पहिल्या ४.२ षटकांत बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांना माघारी पाठवून इंग्लंडची अवस्था ३ बाद ३६ अशी केली. जॉनी बेअरस्टो व जो रूट यांनी ५० चेंडूंत ५६ धावा जोडल्या. कुलदीप यादवने पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू टाकून इंग्लंडला धक्का दिला. ३१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३९ धावा करणारा बेअरस्टो पायचीत झाला. इंग्लंडने ४ बाद १०० धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी अश्विनला पुन्हा गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने कमाल केली. बेन स्टोक्स ( २) त्रिफळाचीत करून अश्विनने डावातील चौथी विकेट घेतली. इंग्लंडचा निम्मा संघ १०३ धावांवर माघारी परतला आणि ते अजून १५६ धावांनी पिछाडीवर आहेत. अश्विनने १३ वेळा स्टोक्सची विकेट घेऊन विक्रम नोंदवला. कसोटीत एकाच फलंदाजाला भारतीय गोलंदाजाने बाद केल्याची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. कपिल देव यांनी मुदस्सर नाझरला १२ वेळा बाद केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अश्विनने १७ वेळा स्टोक्सला बाद करून कपिल देव यांचा ( १६ वि. डेसमंड हायनेस) विक्रम मोडला.
लंच ब्रेकनंतर अश्विनने आणखी एक धक्का देताना बेन फोक्सचा ( ८) त्रिफळा उडवून डावातील पाचवी विकेट घेतली. १००व्या कसोटीत डावात ५ विकेट्स घेणारा तो जगातील चौथा गोलंदाज ठरला. वॉर्नर, मुरलीधरन व कुंबळे यांनी असा पराक्रम केला होता. पण, १००व्या कसोटीत दोन्ही डावांत ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. वॉर्नने पहिल्या डावात २ आणि मुरलीधरनने ३ विकेट्स घेतल्या होत्या. या दोघांनी त्यांच्या १००व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात प्रत्येकी ६ विकेट्स घेतलेल्या.
Web Title: India vs England 5th Test Live update Day 3 : R ASHWIN NOW HAS MOST FIFERS BY INDIANS IN TEST CRICKET, he becomes the FIRST ever cricketer to take 4 (or more) wickets in both innings of his 100th Test match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.