वर्ल्ड रेकॉर्ड! आर अश्विनने कसोटीत १४७ वर्षांत कोणालाच न जमलेला पराक्रम केला  

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. आर अश्विनने त्याच्या पहिल्या ४.२ षटकांत बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांना  माघारी पाठवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:03 PM2024-03-09T13:03:05+5:302024-03-09T13:03:26+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 5th Test Live update Day 3  : Ravi Ashwin becomes the first player in the 147 years history of Test cricket to pick a five wicket haul on debut and 100th Test | वर्ल्ड रेकॉर्ड! आर अश्विनने कसोटीत १४७ वर्षांत कोणालाच न जमलेला पराक्रम केला  

वर्ल्ड रेकॉर्ड! आर अश्विनने कसोटीत १४७ वर्षांत कोणालाच न जमलेला पराक्रम केला  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test Live update (  Marathi News  ) : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ अशी विजयाच्या दिशेने कूच केली आहे. धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा निकाल लागण्याची शक्यता बळावली आहे. १००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ( R Ashwin ) डावात पाच विकेट्स घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली. 

१०० व्या कसोटीत आर अश्विनने इतिहास रचला; शेन वॉर्न, मुरलीधरन यांनाही हे नव्हते जमले


इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. आर अश्विनने त्याच्या पहिल्या ४.२ षटकांत बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांना  माघारी पाठवले. जॉनी बेअरस्टो ( ३९) व जो रूट यांनी ५० चेंडूंत ५६ धावा जोडल्या. कुलदीप यादवने इंग्लंडला धक्का दिला.  इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्सला बाद करून अश्विनने नावावर वेगळा विक्रम नोंदवला. अश्विनने १३ वेळा स्टोक्सची विकेट घेतली आणि कसोटीत एकाच फलंदाजाला भारतीय गोलंदाजाने बाद केल्याची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. लंच ब्रेकनंतर अश्विनने आणखी एक धक्का देताना बेन फोक्सचा ( ८) त्रिफळा उडवून डावातील पाचवी विकेट घेतली. 


१००व्या कसोटीत दोन्ही डावांत ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला. वॉर्नने पहिल्या डावात २ आणि मुरलीधरनने ३ विकेट्स घेतल्या होत्या. या दोघांनी त्यांच्या १००व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात प्रत्येकी ६ विकेट्स घेतलेल्या. कसोटी क्रिकेटच्या पदार्पणात आणि १००व्या कसोटीत ८ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. शिवाय पदार्पण व १००व्या कसोटीत डावात ५ विकेट्स घेणारा तो जगातील एकमेव गोलंदाज बनला. जो रूट व टॉम हार्टली चांगले खेळत होते, परंतु जसप्रीत बुमराहने जोडी तोडली. हार्टली २० धावांवर पायचीत झाला.  त्याच षटकात मार्क वूडलाही ( ०) बुमराहने माघारी पाठवले. 

 

Web Title: India vs England 5th Test Live update Day 3  : Ravi Ashwin becomes the first player in the 147 years history of Test cricket to pick a five wicket haul on debut and 100th Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.