India vs England 5th Test Live update ( Marathi News ) : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ अशी विजयाच्या दिशेने कूच केली आहे. धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा निकाल लागण्याची शक्यता बळावली आहे. १००वी कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने ( R Ashwin ) डावात पाच विकेट्स घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली.
१०० व्या कसोटीत आर अश्विनने इतिहास रचला; शेन वॉर्न, मुरलीधरन यांनाही हे नव्हते जमले
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली. आर अश्विनने त्याच्या पहिल्या ४.२ षटकांत बेन डकेट, झॅक क्रॉली व ऑली पोप यांना माघारी पाठवले. जॉनी बेअरस्टो ( ३९) व जो रूट यांनी ५० चेंडूंत ५६ धावा जोडल्या. कुलदीप यादवने इंग्लंडला धक्का दिला. इंग्लंडच्या कर्णधार बेन स्टोक्सला बाद करून अश्विनने नावावर वेगळा विक्रम नोंदवला. अश्विनने १३ वेळा स्टोक्सची विकेट घेतली आणि कसोटीत एकाच फलंदाजाला भारतीय गोलंदाजाने बाद केल्याची ही सर्वोत्तम आकडेवारी आहे. लंच ब्रेकनंतर अश्विनने आणखी एक धक्का देताना बेन फोक्सचा ( ८) त्रिफळा उडवून डावातील पाचवी विकेट घेतली.