Join us  

मोठी बातमी! रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नाही आला, जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व 

रोहित शर्मा मात्र क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर न आल्याने चिंता वाढवली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 10:07 AM

Open in App

India vs England 5th Test Live update  (  Marathi News  ) : भारतीय संघाने पाचव्या कसोटीत पहिल्या डावात मजबूत आघाडी घेतली. रोहित शर्मा मात्र क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर न आल्याने चिंता वाढवली आहे. आर अश्विनने इंग्लंडला दुसऱ्या डावात २ धावांवर पहिला धक्का दिला. बेन डकेट पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४७७ धावा करून २५९ धावांची आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा ( १०३) , शुबमन गिल ( ११०) यांच्या वैयक्तिक शतकं आणि यशस्वी जैस्वाल ( ५७), सर्फराज खान ( ५६) व देवदत्त पड्डिकल ( ६५) यांच्या अर्धशतकाने इंग्लंडला झोडले. कुलदीप यादव ( ३०) व जसप्रीत बुमराह ( २०) यांनी नवव्या विकेटसाठी ४९ धावा जोडून इंग्लंडची डोकेदुखी वाढवली. तिसऱ्या दिवशी जेम्स अँडरसनने भारताला ९वा धक्का देताना कुलदीपला झेलबाद केले. अँडरसनची ही ७०० वी विकेट ठरली. कसोटीत ७०० विकेट्स घेणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला. मुथय्या मुरलीधरन ( ८००) व शेन वॉर्न ( ७०८) हे अँडरसनपेक्षा जास्त विकेट घेणारे गोलंदाज ठरले. शोएब बशीरने डावातील ५ विकेट्स पूर्ण करताना भारताचा पहिला डाव ४७७ धावांवर गुंडाळला. भारताने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेतली आहे.   दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्मा पाठीत उसण भरल्याने मैदानावर आला नाही. उप कर्णधार जसप्रीत बुमराह नेतृत्व करतोय.   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मा