India vs England 5th Test Live updates In Marathi | धर्मशाला: आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून भारताचा आर अश्विन आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांनी कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉलीने शानदार खेळी करत भारताची डोकेदुखी वाढवली. पण, कुलदीप यादवने घातक वाटणाऱ्या क्रॉलीला बाद करून भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला.
क्रॉलीने १ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १०८ चेंडूत ७९ धावांची खेळी. इंग्लिश संघाचे इतर फलंदाज संघर्ष करत असताना त्याने मात्र लय पकडली. सेट झालेल्या क्रॉलीला बाद करण्यात कुलदीपला यश आले. त्याने इंग्लंडच्या सलामीवीराचा त्रिफळा काढून बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर त्याने जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनाही आपल्या जाळ्यात फसवले.
पाहुण्या संघाने आपल्या पहिल्या डावात चांगली सुरूवात केली. इंग्लिश संघाला पहिला झटका देण्यातही कुलदीपला यश आले. त्याने प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या ६४ असताना बेन डकेटला (५८ चेंडू २७ धावा) तंबूत पाठवले. ४८ षटकांपर्यंत इंग्लंडने ६ बाद १८३ धावा केल्या असून भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक (५) आणि रवींद्र जडेजाने १ बळी घेतला.
पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आऱ अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
इंग्लंडचा पहिला संघ -
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
Web Title: India vs England 5th Test Live update Kuldeep Yadav dismisses ZAK CRAWLEY for 79, takes 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.