रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले 

Ind vs Eng 5th Test : कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी १८ षटकं खेळून काढताना चांगला खेळ केला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 04:41 PM2024-03-08T16:41:33+5:302024-03-08T16:51:15+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 5th Test Live update Stump Day 2 : Rohit Sharma ( 103), Shubman Gill ( 110), Yashasvi jaiswal ( 57), Devdutt Padikkal ( 65) & Sarfaraz Khan ( 56); India 473/8, take 255 runs lead | रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले 

रोहित, शुबमन, यशस्वी, देवदत्त, सर्फराज...सारे सॉलिड खेळले; त्यानंतर शेपटानेही झोडले 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test Live update (  Marathi News  ) : रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या शतकांनंतर सर्फराज खान व देवदत्त पड्डिकल यांनी वादळी फटकेबाजी केली. या दोघांनी संघाला ४०० पार पोहोचवले. ३ बाद ३७६ वरून भारताचा डाव ८ बाद ४२८ धावा गडगडला होता, परंतु कुलदीप यादव व जसप्रीत बुमराह यांनी ९व्या विकेटसाठी दुसऱ्या दिवसाची १८ षटकं खेळून काढताना चांगला भारताला अडीचशेपार आघाडी मिळवून दिली. 

शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागल्याने वडील नाराज; म्हणाले, हे योग्य नाही...


इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी ५० हून अधिक धावा चोपताना नवा विक्रम नोंदवला. २००९ ( वि. श्रीलंका) नंतर प्रथमच भारताच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या. यशस्वी ( ५७) बाद झाल्यानंतर रोहित शर्मा ( १०३)  व शुबमन गिल ( ११०) यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि २४४ चेंडूंत १७१ धावांची भागीदारी केली. लंच ब्रेकनंतर बेन स्टोक्स व जेम्स अँडरसन यांनी दोघांना बाद केल्यानं भारत बॅकफूटवर जाईल असा अंदाज होता. 


पण, सर्फराज खान व पदार्पणवीर देवदत्त पड्डिकल यांनी आक्रमक फटकेबाजी केली आणि १३२ चेंडूंत ९७ धावा जोडल्या. टी ब्रेकनंतर शोएब बशीरने भारताचे दोन्ही सेट फलंदाज माघारी पाठवले. सर्फराज ६० चेंडूंत ८ चौकार व  १ षटकारासह ५६ धावांवर झेलबाद झाला, तर देवदत्त १०३ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ६५ धावांवर त्रिफळाचीत झाला. ध्रुव जुरेल ( १५) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बशीरला विकेट देऊन बसला. टॉम हार्टलीने इंग्लंडला ७वे यश मिळवून देताना रवींद्र जडेजाला ( १५) पायचीत केले. त्याच षटकात आर अश्विनचा ( ०) त्रिफळा उडाला. कुलदीप ( २७ ) व जसप्रीत ( १९) यांनी दिवसअखेर चांगली झुंज दिली. भारताने ८ बाद ४७३ धावा केल्या असून २५५ धावांची आघाडी घेतली आहे. 
 

Web Title: India vs England 5th Test Live update Stump Day 2 : Rohit Sharma ( 103), Shubman Gill ( 110), Yashasvi jaiswal ( 57), Devdutt Padikkal ( 65) & Sarfaraz Khan ( 56); India 473/8, take 255 runs lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.