Join us  

India vs England 5th Test : मॅंचेस्टर कसोटी रद्द होण्याच्या मार्गावर? सौरव गांगुलींचं सूचक विधान, म्हणाले...

India vs England 5th Test Update: भारतीय संघव्यवस्थापनामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामन्यावर अनिश्चिततेची तलवार लटकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 6:42 PM

Open in App

मँचेस्टर - भारतीय संघव्यवस्थापनामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामन्यावर अनिश्चिततेची तलवार लटकली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनामधील एक जण आज कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर सर्व खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट गुरुवारी रात्री ९ वाजता येणार आहे. जर या रिपोर्टमध्ये काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळले तर सामना रद्द केला जाईल. मात्र खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर नियोजित वेळापत्रकानुसार कसोटी खेळली जाईल. दरम्यान, बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांनी पाचव्या कसोटी सामन्याबद्दल सूचक विधान केले आहे. मँचेस्टर कसोटी होणार की नाही हे मला माहिती नाही, असे सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. (Manchester Test on the verge of cancellation?Sourav Ganguly said he did not know whether the match would take place or not)

भारतीय क्रिकेट संघाचे ज्युनिअर फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. योगेश यांच्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. भारतीय संघाने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन गुरुवारी सरावही रद्द केला होता. सर्व खेळाडू आपल्या खोल्यांमध्ये बंद आहेत, तसेच सध्या आपल्या आरटी-पीसीआर चाचणीच्या रिपोर्टची वाट पाहत आहेत.

दरम्यान, मँचेस्टरमध्ये भारताचे रेकॉर्ड फार वाईट आहे. येथे भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. भारतीय संघ येथे एकूण ९ कसोटी सामने खेळला आहे. त्यातील ४ कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. तर पाच सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने मँचेस्टरमधील मागचा कसोटी सामना एका डावाने गमावला होता.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघकोरोना वायरस बातम्या
Open in App