Join us  

सर्फराज तू असा उभा राहा, यशस्वी तू इथे पोझिशन घे... रोहितची भन्नाट फिल्ड सेटिंग, Video

रोहित शर्मा या मालिकेत वेगळ्याच मूडमध्ये दिसतोय आणि तो चाहत्यांचे मनोरंजन करतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 8:36 PM

Open in App

India vs England 5th Test : भारतीय संघातील सर्वात खोडकर खेळाडू कोण? असा प्रश्न मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना नुकताच एका कार्यक्रमात विचारला गेला होता. तेव्हा त्यांनी कर्णधार रोहित शर्माकडे पाहून आपले शर्माजी.. असे उत्तर दिले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला... सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेतही रोहितने अनेकदा इंटरटेनमेंट केले आहे. त्याचा हजरजबाबीपणा, बेधडक उत्तरांची चर्चा रंगते... बेन डकेटने जेव्हा यशस्वी जैस्वालच्या आक्रमक खेळीचे श्रेय इंग्लंडला द्यायाला पाहिजे असे म्हटले, तेव्हा रोहित म्हणाला, आमच्याकडे रिषभ पंत आहे आणि त्याची बॅटींग कदाचित डकेटने पाहिली नाही.. 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही असे अनेक किस्से घडले. जेव्हा या मालिकेत दोनदा भोपळ्यावर रोहित बाद झाला आणि त्यानंतर पुढील डावात जेव्हा चौकार मिळवून भोपळ्याची मालिका खंडित केली असे त्याला वाटत होते. पण, अम्पायरने लेग बाय दिल्याने धावफलकावरील त्याच्या धावा या शून्यच राहिल्या. तेव्हा रोहितने गमतीने, वीरू ( अम्पायर) यार बॅट को लगा नही था क्या? असा सवाल केला.  पाचव्या कसोटीतही असाच एक गमतीदार किस्सा पाहायला मिळाला... जॉनी बेअरस्टो फलंदाजी करत असताना रोहित गोलंदाजाला इस को कैसे भी बॉल डाल, खेलेगा नही, असे बोलताना स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाले.

त्याच बेअरस्टोसाठी फिल्ड सेटिंग करताना रोहित सर्फराज खानयशस्वी जैस्वाल यांना पकडून कुठे उभे राहायचे हे दाखवताना दिसला... हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पाचव्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ५७.४ षटकांत २१८ धावांवर गडगडला. झॅक क्रॉली (१०८ चेंडू ७९ धावा) वगळता एकाही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही.  कुलदीप यादवने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर आर अश्विन (४) आणि रवींद्र जडेजाला (१) बळी घेण्यात यश आले. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या दिवसअखेर १ बाद १३५ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल ५७ धावांवर बाद झाला, तर रोहित ५२ धावांवर नाबाद आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्मासर्फराज खानयशस्वी जैस्वाल