India vs England 5th Test ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना उद्यापासून धर्मशाला येथे सुरू होत आहे. भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने सलग ३ सामने जिंकले आणि आता त्यांना ११२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडच्या बॅझबॉलची बरीच चर्चा रंगली होती, परंतु भारताच्या युवा फलंदाजांनी इंग्रजांना चकित केले. यशस्वी जैस्वालने दोन द्विशतक ठोकून मालिकेत चमकला आहे. पण, यशस्वीच्या या आक्रमक खेळीचे श्रेय लाटण्याचा इंग्लंडच्या बेन डकेटकडून प्रयत्न झाला आणि रोहित शर्माने आज त्याला दमदार उत्तर दिले.
हैदराबाद कसोटीत जैस्वालने ८० चेंडूंत ९६ धावा चोपल्या होत्या आणि त्यानंतर विशाखापट्टणम कसोटीत ७०हून अधिक स्ट्राईक रेटने द्विशतक झळकावले होते. रांची कसोटीतही त्याने ७३ व ३७ धावा केल्या होत्या. पाचव्या कसोटीत तो महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. जैस्वालच्या या आक्रमक खेळीचं श्रेय डकेटने बॅझबॉलला दिले होते. तो म्हणालेला, जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना आक्रमकपणे खेळताना पाहता, तेव्हा तुम्हालाही तसेच खेळण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळेच यशस्वीच्या आक्रमक खेळीचं क्रेडीट आम्हाला मिळायला हवे.''
पाचव्या कसोटीच्या पूर्वसंध्येला जेव्हा रोहितला इंग्लंडच्या डकेटच्या विधानाबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला यांनी
रिषभ पंतला खेळताना पाहिले नाही. ''आमच्या संघात
रिषभ पंत नावाचा खेळाडू होता, कदाचित बेन डकेटने त्याला खेळताना पाहिले नसावे,''असे रोहित म्हणाला.
Web Title: India vs England 5th Test : There was a guy called Rishabh Pant in our team, Probably Duckett hasn't seen him play. (When asked Yashasvi learning from Duckett), Captain Rohit Sharma in today's Press
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.