लंडन - तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वची इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू अॅलेक्स हेल्स स्नायूच्या दुखापतीमुळे उर्वरीत मालिकेतून ‘आऊट’ झाला आहे. इंग्लंड क्रिकेटने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. अॅलेक्स हेल्सच्या जागी इंग्लंड संघात डेविड मलान याला संधी देण्यात आली आहे.
रिपोर्टनुसार, फिटनेस चाचणीदरम्यान कोचला अॅलेक्स हेल्सला स्नायूचा त्रास होत असल्याचे समोर आले. अॅलेक्स हेल्सला डॉक्टरांनी तीन ते चार आठवड्याचा आराम करण्यासा सांगितले आहे. अॅलेक्स हेल्सने ऑस्ट्रेलियाविरोधात विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.
तीन वन-डे सामन्याच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत आधीच 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा विराटसेनाचा प्रयत्न असेल. आजच्या सामन्यात इंग्लंडकडून जोस बटलरला फलंदाजी क्रमामध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याने पहिल्या सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळताना अर्धशतकी खेळी केली आणि फिरकीपटूंना समर्थपणे तोंड दिले होते.
2016 पासून विजयरथ
भारतीय संघाने जानेवारी 2016 ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर द्विपक्षीय एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावलेली नाही. त्यानंतर सलग 9 मालिका जिंकल्या आहेत. त्यात 2017ची चॅम्पियन्स ट्रॉफी अशी एकमेव स्पर्धा आहे ज्यात भारत विजय मिळवू शकला नाही.
Web Title: India vs England : Alex Hales ruled out of ODI series due to side strain; Dawid Malan named as replacement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.