लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि फलंदाज अॅलिस्टर कुकने निवृत्तीचा निर्णय घेतला आणि अनेकांनी भुवया उंचावल्या. कुक एवढा फिट असून निवृत्त का होतोय, असे प्रश्नही चाहत्यांनी विचारले. पण आता कुकच्या निवृत्तीमागील गुपित उलगडलं आहे. दस्तुरखुद्द कुकनेच निवृत्तीबाबत खुलासा केला आहे.
भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर कुक निवृत्त होणार आहे. इंग्लंडचा यशस्वी कर्णधार आणि सर्वाधिक धावा करणा फलंदाज, अशी त्याची ओळख आहे. कुक हा भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे काही विक्रम मोडू शकतो, असे काही जणांना वाटले होते. पण आता निवृत्तीनंतर सचिनच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
निवृत्तीच्या निर्णयाबाबत कुक म्हणाला की, " आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मी नेहमीच मानसीकरीत्या सक्षम होतो. पण यापुढे मी मानसीकरीत्या सक्षम राहीन की नाही, हे माहिती नाही. त्यामुळेच मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे."