लंडन : भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा शांत खेळाडू. तो कधी कुणावर भडकेल, असे वाटत नाही. पण इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी- 20 सामन्यात मात्र भुवनेश्वर डेव्हिड विलीवर मात्र चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.
पहिल्या ट्वेन्टी-20 लढतीत इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. इंग्लंडच्या डावातील अखेरचा चेंडू शिल्लक होता. तो चेंडू टाकण्यासाठी भुवनेश्वरने रनअप घेतला, तो चेंडू टाकण्यासाठी यष्ट्यांजवळ आला, तो चेंडू टाकणार इतक्यात फलंदाज डेव्हिड विलीने त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यावेळी भुवनेश्वर चेंडू टाकण्याच्या तयारीतच होता. पण भुवनेश्वरला हा चेंडू टाकता आला नाही.
विलीने ऐनवेळी थांबायला सांगितल्यामुळे भुवनेश्वर चांगलाच चिडला. त्याने मला का थांबवले याचे कारण विलीला विचारले. पण विलीने त्याला तू गोलंदाजीला परत जा, अशी खूण केली. त्यावेळी भुवनेश्वर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.