लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत भारताच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम इंग्लंडच्या खेळाडूकडून मोडला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा बीए चंद्रशेखर यांच्या नावावर असलेला हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसन याला चंद्रशेखर यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 35 वर्षीय अँडरसन पूर्णपणे फिट नाही आणि तंदुरूस्त झाल्यावरच तो भारताविरूद्धच्या मालिकेत खेळू शकणार आहे. अँडरसन खांद्याच्या दुखापतीने ग्रस्त आहे. जूनमध्ये झालेल्या पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेत तो खेळू शकला नव्हता. अँडरसनने भारताविरूद्ध 22 कसोटी सामन्यांत 28.17च्या सरासरीने 86 विकेट्स घेतल्या आहेत. 42 धावांत पाच विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याला चंद्रशेखर यांचा विक्रम मोडण्यासाठी 10 विकेट्सची गरज आहे. चंद्रशेखर यांनी इंग्लंडविरूद्ध 23 कसोटीत 27.27च्या सरासरीने 95 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 1964 ते 1979 या कालावधीत आठ वेळा पाचपेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. सध्याच्या घडीला आर. अश्विन 11 सामन्यांत 45 विकेट्ससह भारतीय गोलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पाच यशस्वी गोलंदाजविकेट गोलंदाज ( देश-कसोटी ) 95 बीएस चंद्रशेखर (भारत - 23 टेस्ट)92 अनिल कुंबळे (भारत – 19 टेस्ट)86 जेम्स अँडरसन (इंग्लंड – 22 टेस्ट)85 बिशनसिंग बेदी (भारत – 22 टेस्ट)85 कपिल देव (भारत – 27 टेस्ट)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India Vs England : अँडरसनला भारताच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडण्याची संधी
India Vs England : अँडरसनला भारताच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडण्याची संधी
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत भारताच्या दिग्गज खेळाडूचा विक्रम इंग्लंडच्या खेळाडूकडून मोडला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 1:06 PM
ठळक मुद्देअँडरसनने भारताविरूद्ध 22 कसोटी सामन्यांत 28.17च्या सरासरीने 86 विकेट्स घेतल्या आहेत.