मुंबई: भारतीय संघानं नुकताच ऑस्ट्रेलियन संघाला ऑस्ट्रेलियात पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. भारताच्या कसोटी मालिका विजयात मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारानं मोलाचं योगदान दिलं. पुजारानं एक बाजू नेटानं लावून धरली. त्यामुळे इतर फलंदाजांचं काम सोपं झालं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुजारानं सर्वाधिक चेंडू खेळून काढले. ऑस्ट्रेलियात चिवट फलंदाजी करून संघाच्या विजयात योगदान देणाऱ्या पुजाराला आता फिरकीपटू रवीचंद्रन अश्विननं आव्हान देत पैज लावली आहे.
...म्हणून मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे चेंडू अंगावर घेतले; पुजारानं सांगितलेलं कारण वाचून डोळे पाणावतील
भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. त्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून होईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर अश्विननं त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्याशी संवाद साधला. इंग्लंडविरुद्ध खेळताना पुजारानं फिरकीपटूच्या गोलंदाजीवर षटकार ठोकण्याचं आव्हान यावेळी अश्विननं दिलं. पुजारानं षटकार ठोकल्यास अर्धी मिशी काढू, असं म्हणत अश्विननं पैजच लावली.
अब इंग्लंड की बारी! कांगारुंनंतर इंग्लंडला लोळविण्यासाठी भारत सज्ज; संघाची घोषणा
पुजारा ऑफ स्पिनरला षटकार ठोकताना दिसेल का, असा प्रश्न अश्विननं राठोर यांना यूट्यब संवादादरम्यान विचारला. त्यावर 'काम सुरू आहे. एकदा तरी षटकार मार यासाठी मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय. पण अद्याप तरी मला यश आलेलं नाही. षटकार मारण्याची गरज का नाही, हे पटवून देण्यासाठी पुजारा मला एकापेक्षा एक कारणं देत आहे,' असं उत्तर राठोर यांनी दिलं.
'पुजारानं येत्या मालिकेत मोईन अली किंवा इतर कोणत्याही फिरकीपटूच्या गोलंदाजीवर पुढे सरसावून षटकार ठोकल्यास मी अर्धी मिशी काढेन आणि मैदानावर खेळायला येईन. मी अगदी जाहीरपणे हे आव्हान देत आहे,' असं अश्विन पुढे म्हणाला. त्यावर राठोर यांनी हे आव्हान उत्तम असल्याचं म्हटलं. 'तो हे आव्हान स्वीकारेल, अशी आशा करूया. पण तो हे आव्हान स्वीकारेल, असं वाटत नाही,' असंदेखील राठोर पुढे म्हणाले.
Web Title: India vs England Ashwin Promises To Shave Half His Moustache If Cheteshwar Pujara Completes Challenge
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.