India vs England 5th Test : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतानं २-१ अशी आघाडी घेतली होती. पण, पाचवी कसोटी रद्द करावी लागली आणि इंग्लंड-भारत मालिकेचा निकाल अधांतरी राहिला. या मालिकेच्या उर्वरित सामन्यासाठी इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) थेट आयसीसीला पत्र पाठवले. इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यासाठी हा कसोटी सामना रद्द करण्यात आला, असा आरोप इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी केला, तर आयपीएलमधून इंग्लंडच्या काही खेळाडूंनी माघार घेतली. मँचेस्टर कसोटी रद्द होण्यावरून बराच वाद सुरू असताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं अखेर खरं कारण सांगितलं.
किरॉन पोलार्ड काय खेळला!; २० चेंडूंत धावांचा धो धो पाऊस पाडला, मुंबई इंडियन्सनंही आनंद साजरा केला
भारताचा माजी कर्णधार गांगुली यानं संपूर्ण एपिसोड सांगितला. The Telegraphला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीनं सांगितलं की,'भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास स्पष्ट नकार दिला.' पाचवी कसोटी रद्द होण्यामागे हे एकमेव कारण आहे. तो पुढे म्हणाला,''खेळाडूंनी खेळण्यास नकार दिला, पंरतु तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही. खेळाडू फिजिओ योगेश परमार यांच्या संपर्कात आले होते. नितीन पटेल हे विलगीकरणात गेल्यानंतर परमार हेच खेळाडूंसोबत होते. ते खेळाडूंमध्ये मुक्तपणे फिरत होते. ते खेळांडूना मसाजही देत होते.''
भारत-इंग्लंड यांच्यातील रद्द झालेली मँचेस्टर कसोटी कधी होणार, हे ठरलं!
फिजिओचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आणि सर्व घाबरलेही होते, असेही गांगुलीनं सांगितले. 'फिजिओचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजताच खेळाडू घाबरले होते. आपल्यालाही कोरोना होतो की काय, अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यानंतर बायो बबलमध्ये राहणे सोपं नव्हतं. त्यांच्या मतांचा आदर करायलाच हवा होता,''हे गांगुलीनं स्पष्ट केलं.
रद्द कसोटीच्या निर्णयाबाबत ईसीबीचे आयसीसीला साकडे; पाचव्या कसोटीचा पेच
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या रद्द झालेल्या पाचव्या कसोटी सामन्याबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला एक पत्र लिहिले आहे. यात या मालिकेच्या भवितव्याविषयीची निर्णयप्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्राची ईसीबीच्या प्रवक्त्यानेही पुष्टी केली आहे. दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये या मालिकेच्या भविष्याविषयी तोडगा न निघाल्यामुळे ईसीबीने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता बोलली जात आहे.
भारतीय संघ पुढच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी हा एकमेव सामना खेळवल्या जाण्याबाबत ‘ईसीबी’ आणि ‘बीसीसीआय’ सकारात्मक दिसले. मात्र, जर पुढच्या वर्षी सामना झालाच तर त्या सामन्याचा निकाल कसोटी मालिकेसाठी ग्राह्य धरावा, असे टॉम हॅरिसन यांचे म्हणणे होते. या मुद्यावर दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये सहमती न होऊ शकल्याने ईसीबीने आयसीसीकडे धाव घेतली.