चेन्नई - ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करून मायदेशात परतलेल्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई कसोटीतील या पराभवामुळे भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडला असून, आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याच्या भारताच्या स्वप्नालाही धक्का बसला आहे. (India VS England) दरम्यान, या पराभवापाठोपाठ भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला असून, संघातील हुकमी एक्का असलेला दिग्गज अष्टपैलू खेळाडू संपूर्ण मालिकेसाठी दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. (Ravindra Jadeja ruled out of the entire Test series )पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र भारतीय संघाच्या या प्रयत्नांना धक्का देणारी माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान जखमी झालेला अष्टपैलू गोलंदाज रवींद्र जडेजा हा दुखापतीमधून अद्याप सावरला नसून तो संपूर्ण मालिकेतून बाहेर गेला असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकबझ या क्रिकेट विषयक संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिली आहे.इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करताना दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र तिसऱ्या कसोटीपूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आता आलेल्या वृत्तानुसार रवींद्र जडेजाला झालेली दुखापत आतापर्यंत पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे त्याला क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तसेच टी-२० मालिकेत आणि दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत जडेजाने अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवली होती. मात्र सिडनीत झालेल्या तिसऱ्या कसोटीत फलंदाजी करत असताना जडेजाचा बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी तसेच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे वृत्त आल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींची निराशा झाली आहे. दरम्यान, जडेजा संघाबाहेर असला तरी सोशल मीडियावर त्याचे नाव ट्रेंडिंगमध्ये आहे. जडेजा संघात असतान तर इंग्लिश फलंदाजांना फलंदाजी करणे अवघड गेले असते, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India VS England : भारतीय संघाला मोठा धक्का, हुकमी एक्का दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर
India VS England : भारतीय संघाला मोठा धक्का, हुकमी एक्का दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर
India VS England Update :
By बाळकृष्ण परब | Published: February 11, 2021 11:10 AM
ठळक मुद्देअष्टपैलू गोलंदाज रवींद्र जडेजा हा दुखापतीमधून अद्याप सावरला नसून तो संपूर्ण मालिकेतून बाहेर गेला असल्याची माहिती समोर आलीत्याला क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहेपहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करताना दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाला संघात स्थान देण्यात आले नव्हते