India Vs England : चेन्नई कसोटीत केली ११४ वर्षे जुन्या रेकॉर्डशी बरोबरी, आता अश्विनने मानले कॅप्टन विराटचे आभार, हे आहे कारण

Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात ६ बळी घेत इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

By बाळकृष्ण परब | Published: February 9, 2021 10:17 AM2021-02-09T10:17:20+5:302021-02-09T10:18:47+5:30

whatsapp join usJoin us
India Vs England: Chennai Test equals 114-year-old record, now Ashwin thanks Captain Virat, because | India Vs England : चेन्नई कसोटीत केली ११४ वर्षे जुन्या रेकॉर्डशी बरोबरी, आता अश्विनने मानले कॅप्टन विराटचे आभार, हे आहे कारण

India Vs England : चेन्नई कसोटीत केली ११४ वर्षे जुन्या रेकॉर्डशी बरोबरी, आता अश्विनने मानले कॅप्टन विराटचे आभार, हे आहे कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याला झेलबाद केले होतेगेल्या १३३ वर्षांत असा कारनामा करणारा अश्विन हा तिसरा फिरकीपटू ठरलातर गेल्या ११४ वर्षांमधील पहिला फिरकीपटू ठरला आहे

चेन्नई - भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात ६ बळी घेत इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला होता. दरम्यान, या डावात डावातील पहिल्याच चेंडूवर बळी मिळवत अश्विनने अनोखा विक्रम केला होता. दरम्यान, या विक्रमाबद्दल कळल्यावर आनंद व्यक्त करताना कर्णधार विराट कोहलीचे खास आभार मानले आहेत.

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याला झेलबाद केले होते. त्याचा झेल अजिंक्य रहाणेने टिपला होता. गेल्या १३३ वर्षांत असा कारनामा करणारा अश्विन हा तिसरा फिरकीपटू ठरला. तर गेल्या ११४ वर्षांमधील पहिला फिरकीपटू ठरला आहे. यापूर्वी १९०७ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर बर्ट वोगलर याने इंग्लंडच्या टॉम हॅवर्डला कसोटी क्रिकेटमधील पहिल्या चेंडूवर बाद केले होते. तर असा कारनामा करणारा पहिला फिरकीपटू बॉबी पील होते. त्यांनी १८८८ मध्ये अ‍ॅशेस मालिकेत अशी कमाल केली होती.

दरम्यान, रविचंद्रन अश्विनने बीसीसीआय टीव्हीवर इशांत शर्मासोबत बोलताना सांगितले की, जेव्हा मी दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर बळी घेतला, तेव्हा मी खूप खूश झालो होतो. मात्र हा विक्रम आहे हे मला माहिती नव्हते. संघव्यवस्थापनाने मला सांगितले की, असा विक्रम १०० वर्षांत पहिल्यांदा झाला आहे. मी विराट कोहलीचे आभार मानतो. कारण मला माहिती होते की तू डावाची सुरुवात करशील. पण विराटने पहिले षटक मला दिले. गोलंदाजांसाठी दफनभूमी ठरलेल्या खेळपट्टीवर ७३ षटके गोलंदाजी करणे सोपे नव्हते, असेही त्याने सांगिलते.



चेन्नईतील खेळपट्टीबाबत अश्विन म्हणाला की, जेव्हा मी खेळपट्टी पाहिली तेव्हा मला वाटले की, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असेल. दुसऱ्या दिवसापासून ती अधिक चांगली होईल. ही खरोखरच सपाट खेळपट्टी आहे आणि त्यावर नाणेफेक महत्त्वपूर्ण ठरली आहे. असे असले तरी आम्ही सामन्यात चांगल्या पद्धतीने पुनरागमन केले आहे. पाचव्या दिवशी चांगला खेळ केल्यास आम्ही जिंकू शकतो.

 

Web Title: India Vs England: Chennai Test equals 114-year-old record, now Ashwin thanks Captain Virat, because

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.