चेन्नई - भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात ६ बळी घेत इंग्लंडचा डाव झटपट गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला होता. दरम्यान, या डावात डावातील पहिल्याच चेंडूवर बळी मिळवत अश्विनने अनोखा विक्रम केला होता. दरम्यान, या विक्रमाबद्दल कळल्यावर आनंद व्यक्त करताना कर्णधार विराट कोहलीचे खास आभार मानले आहेत.रविचंद्रन अश्विनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याला झेलबाद केले होते. त्याचा झेल अजिंक्य रहाणेने टिपला होता. गेल्या १३३ वर्षांत असा कारनामा करणारा अश्विन हा तिसरा फिरकीपटू ठरला. तर गेल्या ११४ वर्षांमधील पहिला फिरकीपटू ठरला आहे. यापूर्वी १९०७ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर बर्ट वोगलर याने इंग्लंडच्या टॉम हॅवर्डला कसोटी क्रिकेटमधील पहिल्या चेंडूवर बाद केले होते. तर असा कारनामा करणारा पहिला फिरकीपटू बॉबी पील होते. त्यांनी १८८८ मध्ये अॅशेस मालिकेत अशी कमाल केली होती.दरम्यान, रविचंद्रन अश्विनने बीसीसीआय टीव्हीवर इशांत शर्मासोबत बोलताना सांगितले की, जेव्हा मी दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर बळी घेतला, तेव्हा मी खूप खूश झालो होतो. मात्र हा विक्रम आहे हे मला माहिती नव्हते. संघव्यवस्थापनाने मला सांगितले की, असा विक्रम १०० वर्षांत पहिल्यांदा झाला आहे. मी विराट कोहलीचे आभार मानतो. कारण मला माहिती होते की तू डावाची सुरुवात करशील. पण विराटने पहिले षटक मला दिले. गोलंदाजांसाठी दफनभूमी ठरलेल्या खेळपट्टीवर ७३ षटके गोलंदाजी करणे सोपे नव्हते, असेही त्याने सांगिलते.