India vs England Chennai Test : भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज इंग्लंडविरुद्धच्या (England) दुसऱ्या कसोटीत (Chennai Test) शून्यावर बाद झाला. कोहली आपल्या खेळीतील पाचव्याच चेंडूवर मोइन अलीच्या (Moeen Ali) फिरकीवर त्रिफळाचीत झाला. कोहलीच्या आजवरच्या कसोटी कारकिर्दीत नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे. कोहलीला पहिल्यांदाच एका फिरकीपटूनं कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केलं आहे. (Virat Kohli Bowled By Moeen Ali, India vs England, 2nd Test, Chennai)
रोहित शर्माचं शतक अन् सोशल मीडियावर चर्चा रितिकाची, Video पाहिल्यावर समजेल कारण!
विराट कोहली त्याच्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत आजवर ११ वेळा शून्यावर बाद झाला आहे. पण याआधी कोहली फक्त वेगवान गोलंदाजांच्या गोलंदाजीवर शून्यावर माघारी परतला होता. चेन्नई कसोटीत आज पहिल्यांदाच कोहली एका फिरकीपटूकडून शून्यावर बाद झाला आहे. महत्वाची बाब अशी की विराट कोहलीनं आयपीएल स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातून यंदा मोइन अलीला करारमुक्त केलं. त्याच मोइन अलीनं आज कोहलीला शून्यावर क्लीनबोल्ड केलं. कोहलीच्या या विकेटची सोशल मीडियातही जोरदार चर्चा होऊ लागली आहे आणि त्यावर मिम्सही तयार केले जाऊ लागले आहेत.
दशकातील सर्वोत्तम चेंडू?; विराट कोहलीही स्तब्ध, रोहितला विचारलं खरंच OUT आहे का?
मोइन अली आयपीएलच्या गेल्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला. पण त्याला काही विशेष छाप पाडता आली नाही. मोइन अलीनं तीन सामन्यात केवळ १२ धावा केल्या होत्या. तर केवळ एकच विकेट घेतली होती. यामुळे यंदाच्या आयपीएलसाठी कोहलीच्या संघानं मोइन अलीला करारमुक्त करुन संघातून बाहेरचा रस्ता दाखवला.
कसोटी क्रिकेटमध्ये ११ वेळा शून्यावर बाद झालाय कोहलीविराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये मोइन अलीचा आता अकरावा क्रमांक लागला आहे. कोहलीला याआधी वेस्टइंडिजच्या रवी रामपॉल, ऑस्ट्रेलियाच्या बेन हिल्फेनहास, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स, इंग्लंडच्या लियाम प्लंकेट, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, श्रीलंकेच्या सुरंगा लकमल, वेस्ट इंडिजच्या किमार रोच आणि बांगलादेशच्या अबू जायद यांनी शून्यावर बाद केलं आहे. त्यात आता मोइन अलीचाही समावेश झाला आहे.