Join us  

India vs England: अखेरच्या सामन्यात कूकचे अर्धशतक; बुमराहने घेतले २ बळी

सलामीवीर अलेस्टर कूक (७१) याने आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात अर्धशतक केले. इंग्लंडने पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध संथ पण चांगली सुरूवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 2:24 AM

Open in App

लंडन : सलामीवीर अलेस्टर कूक (७१) याने आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात अर्धशतक केले. इंग्लंडने पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध संथ पण चांगली सुरूवात केली. चहापानानंतर इंग्लंडने ६४ षटकांत ३ बाद १३३ धावा केल्या.कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळणाऱ्या अ‍ॅलेस्टर कूकने य्संथ फलंदाजी केली. मात्र ९ डावानंतर तो पहिल्यांदाच आपले अर्धशतक पूर्ण करु शकला. कूकने सलामीवीर किटोन जेनिंग्जसह (२३) ६० धावांची तर मोईन अलीसह ७३ धावांची भागिदारी करत डावाला आकार दिला.चहापानापर्यंत कूक याने ६६ तर मोईन अली याने २३ धावा केल्या होत्या. ६४ व्या षटकांत सामना काहीसा भारताच्या बाजुने झुकला . या षटकातील दुसºया चेंडूवर बुमराहने कूकला त्रिफळाचीत केले. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर कर्णधार जो रुट याला पायचीत करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. जो रुट याने सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर अखेरचा कसोटी सामना खेळणाºया कूक याला भारतीय संघाने गार्ड आॅफ आॅनर दिला.भारतीय गोलंदाजांमध्ये डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजा याने जेनिंग्ज याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. मोहम्मद शमी याला पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी करताना अडचण येत होती. मात्र दुसºया स्पेलमध्ये त्याने प्रभावी गोलंदाजी केली. शमीने कूक आणि मोईन अली यांना सातत्याने अडचणीत आणले.जसप्रीत बुमराह आणि इशांत यांनी सुरूवातीपासून अचूक गोलंदाजी केली. मात्र कूक आणि जेनिंग्ज यांनी सावध खेळ केला. बुमराहने दोन, तर जाडेजाने एक बळी घेतला.मालिकेतील या अखेरच्या सामन्यासाठी यजमान इंग्लंडने संघात कोणताही बदल केला नाही. त्याचवेळी भारताने हार्दिक पांड्याच्या जागी हनुमा विहारी याला संधी दिली. तसेच दुखापतग्रस्त रविचंद्रन अश्विनच्या जागी अष्टपैलू जाडेजाला संधी मिळाली. (वृत्तसंस्था)धावफलकइंग्लंड (पहिला डाव) : ६४ षटकांत तीन बाद १३३ धावा (अ‍ॅलेस्टर कूक त्रि. गो. बुमराह ७१, किटन्स जेनिंग्ज झे. राहूल गो. जाडेजा २३, मोईन अली २८*, जो रुट पायचीत बुमराह ०; जसप्रीत बुमराह २/३७, रविंद्र जाडेजा १/३६)

टॅग्स :क्रिकेटभारत विरुद्ध इंग्लंड