रोहित शर्मानं कटकमध्ये इतिहास रचला, इंग्लंड विरुद्ध खेळताना षटकारांचा विक्रम मोडला! गेलला टाकलं मागे 

rohit sharma breaks sixes world record in Rohit Sharma Six Record : 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 20:10 IST2025-02-09T20:09:11+5:302025-02-09T20:10:06+5:30

whatsapp join usJoin us
india vs england cuttack 2nd odi Rohit Sharma creates history Breaks record of sixes; Left Chris Gayle behind | रोहित शर्मानं कटकमध्ये इतिहास रचला, इंग्लंड विरुद्ध खेळताना षटकारांचा विक्रम मोडला! गेलला टाकलं मागे 

रोहित शर्मानं कटकमध्ये इतिहास रचला, इंग्लंड विरुद्ध खेळताना षटकारांचा विक्रम मोडला! गेलला टाकलं मागे 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, हे त्याने पुन्हा एकदा कटकच्या मैदानावर दाखवून दिले. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. रोहितने मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात षटकारांचा एक विक्रम मोडला. आता एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ख्रिस गेलला मागे टाकले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात कटक येथे दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात रोहित शर्मा शुभमन गिलसोबत ओपनिंग करण्यासाठी आला. या खेळीत त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला. रोहित आणि गिलने भारताला धमाकेबाज सुरुवात करून दिली आहे.

रोहितने गेलला मागे टाकले -
सध्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकम्याचा विक्रम माजी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने ३९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५१ षटकार ठोकले आहेत. आता रोहित या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पहिला षटकार मारताच रोहितनं ख्रिस गेलला ओव्हरटेक करत आपल्या खात्यात ३३२ षटकारांची नोंद केली. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील भारताच्या डावातील २० व्या षटकापर्यंत रोहितच्या भात्यातून ५ सिक्सर निघाले होते. गेलने ३०१ सामन्यांमध्ये ३३१ षटकार ठोकले आहेत. महेंद्रसिंग धोनी यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने ३५० एकदिवसीय सामन्यांमध्ये २२९ षटकार ठोकले आहेत.

भारतासमोर 305 धावांचे आव्हान - 
भारताने मालिकेतील पहिला सामन्यात विजय मिळवला आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन करत भारतासमोर ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तत्पूर्वी, रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी करत १० षटकांत ३५ धावा देत ३ बळी घेतले.

Web Title: india vs england cuttack 2nd odi Rohit Sharma creates history Breaks record of sixes; Left Chris Gayle behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.