Join us  

India vs England : चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडने काढलंय हे अस्त्र

गोलंदाजीच्या जीवावरच आपण सामना जिंकू शकतो, हे त्यांनी ठरवले आहे. त्यानुसारच त्यांनी आपलं हे शस्त्र बाहेर काढायचं ठरवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 1:45 PM

Open in App
ठळक मुद्दे इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यासाठी खास एक अस्त्र बाहेर काढायचे ठरवले आहे.

साऊदम्पटन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला. आता चौथा कसोटी सामना भारताने जिंकला तर तर मालिकेत 2-2 अशी बरोबरी होऊ शकते. पण इंग्लंडचा संघ हे व्हायला देणार नाही. त्यासाठीच त्यांनी चौथ्या कसोटी सामन्यासाठी खास एक अस्त्र बाहेर काढायचे ठरवले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील आतापर्यंत तिन्ही सामन्यांत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडचा विचार केला तर त्यांच्या फलंदाजांना सूर गवसलेला दिसत नाही. त्यामुळे आता गोलंदाजीच्या जीवावरच आपण सामना जिंकू शकतो, हे त्यांनी ठरवले आहे. त्यानुसारच त्यांनी आपलं हे शस्त्र बाहेर काढायचं ठरवलं आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आले आहे. जेव्हा चेंडू स्विंग होतो तेव्हा भारतीय फलंदाजांना जास्त धावा करता येत नाहीत. हे लक्षात ठेवून इंग्लंडने खेळपट्टी गवताळ करण्याचे ठरवले आहे. आपण फक्त खेळपट्टीच्या जीवावर सामना जिंकू शकतो, असे मांडे जर इंग्लंडचा संघ भाजत असेल तर ते त्यांच्यावर बुमरँग होऊ शकतो. कारण भारताकडेही चांगले वेगवान गोलंदाज आहेत. या तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर उमेश यादवसारखा वेगवान गोलंदाज संघात परतला तर भारताची गोलंदाजी अधक भक्कम होऊ शकते. त्यामुळे इंग्लंडनेही फक्त खेळपट्टीच्या जीवावर सामना जिंकण्याची स्वप्न बघू नयेत, असे जाणकार म्हणत आहेत.

टॅग्स :क्रिकेटभारत विरुद्ध इंग्लंड