India vs England, 1st Test : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं; पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरणार

India vs England, 1st Test :  इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 5, 2021 09:23 AM2021-02-05T09:23:53+5:302021-02-05T09:24:15+5:30

whatsapp join usJoin us
India vs England : England wins the toss and opts to bat; know both team playing XI   | India vs England, 1st Test : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं; पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरणार

India vs England, 1st Test : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं; पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 1st Test :  इंग्लंडचा कर्णधार जो रुटनं नाणेफेक जिंकून पहिल्या कसोटीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास वर्षभरानंतर टीम इंडिया मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरली आहे. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर टीम इंडिया मायदेशात विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) रजेनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे, त्यात इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह व आर अश्विन हेही दुखापतीतून सावरण्यासाठी सज्ज झाले आहेत. आजच्या सामन्यात टीम इंडिया पाच गोलंदाजांसह मैदानावर उतरली आहे. Bad News; सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे खेळाडूची माघार

दुखापतीमुळे टीम इंडियाला पुन्हा धक्का बसला आहे. आजच्या सामन्यात पदार्पणासाठी सज्ज असलेला फिरकी गोलंदाज अक्षर पटेल ( Axar Patel) यानं गुडघे दुखीमुळे पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. त्याच्याजागी शाहबाझ नदीम व राहुल चहर या दोन फिरकी गोलंदाजांचा संघात समावेश केला गेला आहे, अशी माहिती BCCIनं दिली. ''इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून अक्षर पटेलनं माघार घेतली आहे. अष्टपैलू खेळाडूनं त्याच्या डाव्या गुडघ्यात त्रास होत असल्याचे सांगितले. सराव सत्रात त्यानं ही माहिती दिली. त्वरितच BCCIच्या वैद्यकिय टीमनं त्याची चाचणी केली आणि त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. पण, अक्षर पहिल्या कसोटीत खेळणार नाही,''असे बीसीसीआयनं सांगितलं. 

या संकटावर मात करून टीम इंडियानं आजच्या सामन्यात तगडा संघ उतरला आहे. अक्षर पटेलच्या जागी संघात स्थान मिळालेल्या शाहबाझ नदीमने अंतिम ११मध्ये स्थान पटकावले आहे. कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) पुन्हा एकदा डग आऊटमध्ये बसून सामना बघावा लागेल. 

 

टीम इंडिया  (Playing XI): रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,

इंग्लंड (Playing XI):  डॉम सिब्ली, रोरी बर्न्स, डॅन लॉरेन्स, जो रुट, बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर, डॉम बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अंडरसन
 


 

Web Title: India vs England : England wins the toss and opts to bat; know both team playing XI  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.