ठळक मुद्दे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघात कोणत्या खेळाडूंना स्थान द्यायचे, हा पेच भारतीय संघ व्यवस्थपनापुढे असेल.
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघात कोणत्या खेळाडूंना स्थान द्यायचे, हा पेच भारतीय संघ व्यवस्थपनापुढे असेल. पण भारताला सलामीवीर गौतम गंभीरने याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीला याबाबत एक सल्ला दिला आहे.
गंभीरने कोहलीला सल्ला दिला आहे की, " भारतीय संघ निवडताना इंग्लंडमधील वातावरणाचाही विचार करायला हवा. सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये उन्हाळा सुरु आहे. त्यामुळे भारतीय संघात फिरकीपटूही असायला हवेत. संघ निवड करताना हार्दिक पंड्याऐवजी आर. अश्विनला प्राधान्य द्यायला हवे. "
गंभीर याबाबत म्हणाला की, " भारताला जर इंग्लंडमध्ये सामना जिंकायला असेल तर तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा संघात समावेश असायला हवा. भारताने दोन फिरकीपटू निवडताना अश्विनसह कुलदीप यादवला संधी दिली, तर ते संघाच्या हिताचे ठरेल. कारण कुलदीपच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने स्वत:ला सिद्धही केले आहे. "
Web Title: India vs England: Gautam Gambhir gave advice to virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.