ICC Women's T20 World Cup, Semi-Final : भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ( आयसीसी) आली आहे. सिडनीत पावसाचा जोर कायम असल्यामुळे सामना रद्द करावा लागला. त्यामुळे अ गटातील अव्वल संघ म्हणून टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात न आल्यानं हा निर्णय घेण्यात येणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाल्यास गटातील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो.
आयसीसीच्या स्पर्धा नियमानुसार पाऊसाच्या व्यत्ययानंतर किमान २० षटकांचा सामना झाला पाहिजे. त्यात दोन्ही संघांना प्रत्येकी १० षटके मिळावीत. पण, तसेही झाले नाही. त्यामुळे टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला. भारतानं अ गटात 8 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते आणि त्याच जोरावर त्यांचा अंतिम फेरीतील प्रवेश पक्का झाला. इंग्लंडच्या खात्यात 6 गुण होते.
भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी टीम इंडियाला २००९, २०१० आणि २०१८ मध्ये उपांत्य फेरीतून माघारी परतावे लागले होते.
एकही चेंडू पडला नाही तरी टीम इंडिया जाईल फायनलमध्ये, जाणून घ्या कशी
मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-२० वर्ल्ड रेकॉर्ड!
MS Dhoni बद्दलच्या 'त्या' एका प्रश्नानं घडवलं सुनील जोशींचं भवितव्य!