इंग्लंड - भारत कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे आणि तीन आठवड्यांपूर्वी टीम इंडियाला धक्का देणारी बातमी आज समोर आली. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि तो विलगिकरणात गेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि ते सर्व खेळाडू हरहॅमसाठी रवाना झाले आहेत. २० दिवसांच्या सुट्टीत रिषभ पंत यूरो चषक फुटबॉल स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी गेला होता अन् तेथे तो मास्क व सोशल डिस्टन्सिंग या नियमांचं पालन करताना दिसला नव्हता. त्यामुळेच त्याचा कोरोना झाल्याचे समोर येत आहे. आता रिषभ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर टीम इंडियाच्या सराव सामन्यावर परिणाम होईल का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
भारताचा तीन दिवसीय सराव सामना २० जुलैपासून सुरू होणार आहे आणि कौंटी क्रिकेटमधील एकादश संघाविरुद्ध डरहॅम येथे हा सामना खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी टीम इंडियाला या सराव सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. ''भारतीय संघाविरुद्ध कौंटी क्रिकेटमधील ११ खेळाडू खेळतील,''असे सूत्रांनी सांगितले आहे. हा सराव सामना बंद स्टेडियममध्ये खेळवळ्यात येणार असून प्रती दिवस ९० षटकांचा खेळ होणार. या सामन्याचे प्रक्षेपण Durham Cricket's YouTube channel वर होणार आहे.
इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक
४ ते ८ ऑगस्ट - ट्रेंट ब्रिज१२ ते १६ ऑगस्ट - लॉर्ड्स२५ ते २९ ऑगस्ट- हेडिंग्ले२ ते ६ सप्टेंबर - ओव्हल१० ते १४ सप्टेंबर - ओल्ड ट्रॅफर्ड
भारतीय संघ - विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्वि, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, लोकेश राहुल व वृद्धीमान सहा; राखीव खेळाडू - अभिमन्य इस्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवास्वाला